Tuesday, August 04, 2009

"अन्नपुर्णा " ,लोकमान्य टिळक रस्ता, सेलेब्रेशन हॉल जवळ, पश्चिम दहिसर रेल्वेस्थानकाजवळ.

राजाभाऊंवर उपाशी रहाण्याची पाळी आले होती. अन्नपुर्णेने त्यांना तारले, नाहीतर आज त्यांच्या बायकोची काही खैर नव्हती. उपाशी पोटी भडकलेल्या माथ्याने त्यांची जी शिव्यांची सरबत्ती सुरु झाली असती, नशिब तिचे, वाचली ती.

त्याचे असे झाले, एक तर हल्ली कोणाकडे घरगुती समारंभाला जाण्याचे ते टाळतात. तरी त्यांना ती जबरदस्तीने घेवुन गेलेली. ( आधीच्या विचित्र स्वभावात आता माणुसघाणेपणाची भर ), त्यात परत ते वातानुकुलीत हॉल, ते जेवण बनवणारे "सो कॉड केटरर्स " रस्तावरुन धडपकड करुन आणलेले ते वाढपी, ते आचारी, त्यांचा तो गलिच्छपणा, ते भयानक जेवण , (नॉट फिट फॉर ह्युमन कंन्झमशन , असे त्यांचे प्रामाणिक मत), नको से होते.
त्यांच्या नजरेतुन जर "अन्नपुर्णा " सुटले असते तर ? शक्यता तशी कमीच. नजर मात्र घारीसारखी हो. तर येथे जे चविष्ट घरगुती खाणॆ मिळाले त्यांनी त्यांचा आत्मा तॄप्त झाला. पोट समाधान पावले.

त्यांनी आधी नुसती "घावने घेतली, (आता समारंभात जेवायचे होते ना ) पहिल्याच घासात पसंतीची पावती मिळाली. तेवढ्यात एका व्यक्तीने "डाळींबी उसळ" मागीतली. मग काय राजाभाऊंना सुद्ध्या "डाळींबी" लागली आणि ती पण तांदळ्याच्या भाकरी बरोबर.

आता तरी त्यांचे समाधान व्हावे , पण नाही, एकादा खाद्यपदार्थ नुकताच केला आहे, गरमागरम आहे असे पाहिल्यानंतर ते वेडेपिसे होतात, मग मऊसुत पुरणपोळ्यांचा फडसा पाडल्याशिवाय ते कसे मागे राहिले असतील ? परत वरती सहा पोळ्या बांधुन घेतल्या.
अन्नदाता सुखी भव.
आता कधीतरी परत वाट वाकडी करुन दहिसरला जायला हवे निवांत पणॆ.

4 comments:

रोहन... said...

पत्ता नोंदवून घेतलेला आहे... हा.. हा.. लवकरचं मोहिम आखली जाइल... :D

HAREKRISHNAJI said...

You will get homely fodd here. This a is very simple shop.

Vivek S Patwardhan said...

I enjoy reading your posts. But I have decided to read them just before meals. Because everytime I read the blog, I feel very hungry!

Suggestion: Please publish a summary of goo dplaces to eat covered on yor blog! That will save time for gluttons like me.

Vivek

HAREKRISHNAJI said...

विवेकजी,

धन्यवाद. आता आपण सर्वांनी केव्हा बरे भेटायचे.

आपल्या भटकंतीच्या कहाण्या ऐकायच्या आहेत.
ठाण्यातल्या एखाद्या ठिकाणी ?