बरे झाले हो भुजबळजी, सोनारानेच कान टोचले ते.
अगदी योग्य तेच बोललात. शिक्षणचा खरेच बट्टाबोळ करुन ठेवला आहे. सगळी गंमंत जंमत सुरु आहे.
महिना झाला प्राध्यापकांचा संप सुरु आहे, कॉलेज बंद आहेत त्यात आता स्वाईन फ्लुची भर.
गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदलला, नविन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात कॉलेज सुरु झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनी आली, तो पर्यंत सर्व आनंदी आनंद होता.
म.टा. मधुन -
"दहावी नापासांना एटीकेटी, टंचाई, स्वाइन फ्लू आदी विषयांवरील राज्य सरकारच्या निर्णयांवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतच जोरदार हल्ला चढवल्याने सारेच अवाक झाले. शिक्षणाचा जो काही बट्ट्याबोळ झाला आहे, त्याने मुंबईतील सत्ताधारी आमदारांना लोकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही, असे संतप्त उद्गार त्यांनी बैठकीत काढल्याचे कळते.
शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाहून 'शिक्षणाचा तर पुरता बट्ट्याबोळ झालाय', असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. 'एटीकेटी, ऑनलाइन प्रवेश, ऑफलाइन प्रवेश हे निर्णय घ्यायला कुणी सांगितले होते. मुंबईतील प्रत्येक पालक हैराण झाला आहे. ज्याला प्रवेश मिळाला ते विद्याथीर्ही आनंदी नाहीत. कारण त्यांना दहावीस किलोमीटर अंतरावरील कॉलेजात प्रवेश मिळाला आहे. ज्याला प्रवेशच मिळाला नाही ते तर सरकारच्या नावाने खडेच फोडताहेत' असा हल्ला त्यांनी केला. "
3 comments:
hi tin ranganchi idea ekdum mast.!!
तिरंगी रंगामध्ये लिहिलेली ही पोस्ट फारच बोलकी आणि सत्य आहे!
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...!
खरे आहे! शिक्षणाचा जणू बट्ट्याबोळ करण्याचा विडा उचलूनच प्रत्येक शिक्षणमंत्री आलेला असतो. दरवेळी वाटतं की ह्यापेक्षा तो आधीचा गाढव बरा होता. पुरकेला यथेच्छ शिव्या दिल्या होत्या, विखे-पाटलाने त्यालाही मागे टाकलं. उगीच नाही संत लिहून गेले, "उडदामाजी काळे-गोरे...". जाऊ द्या, आपल्या हाती केवळ," तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे" हेच उरते.
Post a Comment