शिरीष कणेकरांच्या " गाये चला जा " या पुस्तकामधुन साभार.
"एकाच सुमारास अनारकलीच्या प्रेमकहानीवर दोन चित्रपट निघत होते. एकाचा संगीतकार होता सी.रामचंद्र आणि दुसऱ्याचा अनिल विश्वास. एक अनारकली पूर्ण होवुन लागला व सी.रामचंद्रच्या मधाळ संगीतामुळॆ तुफान चालला. अनिलच्या दुर्दैवाने त्याचा अनारकली पूर्ण होवु शकला नाही.
"अनारकली" ला भिंतीत चिणण्यात येते त्या क्लायमॅक्स सीनसाठी अनिलदाने लताच्या आवाजात एक सुंदर गाणॆ रेकॉर्डदेखिल केले होते. याच प्रसंगासाठी सी.रामचंद्रने "ये जिंदगी उसीकी है " हि चाल दिली होती. अनिलच्या गाण्याचे शब्द होते " अल्लाह भी है मल्लाह भी है , कस्ती है कि डूबी जाती है " ( सर्व काही आहे, पाठीशी परमेश्वर आहे, नावेला नावाडी आहेम पण माझी नाव मात्र बुडायची ती बुडतेच आहे ) ( आता हे गाणे कॅसेट्स मधे शोधुन ऐकल्याशिवाय चैन पडणार नाही) .चित्रपट डब्यात गेल्याने हे अर्थपूर्ण , दर्दभरे गीत बेवारशी झाले. अकेर ते "मान " नामक चित्रपटात वापरून टाकण्यात आले.
याला म्हणतात गाण्याची किस्मत. लताचा काळीज चिरत जाणारा आवाज वा अनिलची धुंदफुंद चाल काही म्हटल्या काही "अल्लाह भी है " ला तारु शकले नाही. "
शिरीष कणेकरांनी अगदी चपखल शब्दात वर्ण्न केलेय. " लताचा काळीज चिरत जाणारा आवाज ".
"ये जिंदगी" पेक्षा " अल्लाह भी है " मधली लता रुलावुन जाते. आणि हि जखम " ये खलीश कहांसे होती जो जिगर के पार होता " करत ठुसठुशीत रहाते.
2 comments:
नमस्कार हरेकृष्णजी,
खुप खुप आभार ही छान बातमी मला दिल्याबद्दल!! मागेसुद्धा पेपरमध्ये आलेली बातमी तुम्हीच दिली होतीत.. आणि तुमच्या शुभेच्छांसाठी खरंच खुप धन्यवाद..
चकली
aabhari aahe
Post a Comment