Saturday, August 08, 2009

माहेरचे जेवण, संकॄतीची वाटली डाळ, ओव्या आपल्या राज्याच्या आणि आकाशकंदिल दिवाळीतला

राजाभाऊंच्या बायकोने राहत असलेल्या गॄहसंकुलात एक स्नॅक्स काऊंटर काढला आणि महिनाभरात तो बंद पडला. मराठी माणसांना धंदा करता येत नाही तेव्हा आम्ही आता तो व्यवसाय म्हणुन करायचे ठरवले आहे, याच व्यवसायातील मुंबईस्थित एका यशस्वी उद्योजक दांपत्यांकडुन स्पुर्ती घेवुन.

आता आम्ही ( आम्ही म्हणजे कोण मधले) राजाभाऊंनी आणि त्यांच्या बायकोने चार रेस्टॉरंट्स काढायची ठरवली आहेत.
येथे कोणाला प्रवेश द्यावा याचे सर्व हक्क आम्ही राखुन ठेवत आहोत.
फडतुस *** माणसांनी आमच्या उपहारगृहापासुन लांबच रहावे.
येथे येण्याची तुमची योग्यता आहे का हे जाणुन घेतल्याशिवाय पाय ठेवण्याचे धाडस करायची गरज नाही.
भले तुम्ही भरभक्कम रक्कम , ती पण रोकडा मोजुन जेवायला येत असाल तरी पण येथे कसे वागावे, कसे जेवावे , काय जेवावे, काय बोलावे हे जो पर्यंत तुम्हाला कळत नाही तो पर्यंत तुम्ही तेथे जेवायला येवु नयेत.
भविष्यात आम्ही फार मोठी माणसे होणार आहोत आणि आमच्याकडे फार मोठी प्रतिष्ठीत माणसे जेवायला येणार आहेत हे ध्यानी ठेवावेत.
येथे जर आपल्याला जेवायला यायचे असेल तर खालील नियम पाळावेत.
१. येथे कोणात्याही प्रकारची अजीबात कटकट करायची नाही, कुरबुर करायची नाही, किरकिर करायची नाही. येथे जगावरचा राग बायकोवर काढायचा नाही. आनंदात जेवायचे . स्वःतला अजिबात मोठे समजायचे नाही. दुसऱ्यांकडुन कसे वागावे हे प्रथम शिकुन घेणॆ.
२. जेवल्यानंतर आमच्याकडे तुम्ही आमच्या पदार्थांची स्तुती करणे हे सक्तीचे आहे, अगदी आवडले नसले तरी देखील. तुम्हाला सर्व पदार्थ हे आवडलेच पाहिजेत. आपण पैसे मोजले आहेत तर आपल्याला चांगलेच जेवण मिळावे अशी अपेक्षा करण्याचे काहीही कारण नाही.
३. येथे तुम्ही काही मॅनर्स पाळणे आवश्यक आहे. जेवल्यानंतर सर्व कर्मचारीवर्गाचे तुम्ही वैयक्तीकरीत्या आभार मानायलाच हवेत.
४. आमच्याकडे सर्व माल चोख मिळेल त्या संबंधी कोणत्याही स्वरुपाची तक्रार सहन केली जाणार नाही.
५. तुम्ही आमचे कौतुक करायलाच हवे. आमची दखल घ्यायलाच हवी. आम्ही तुम्हाला खायला घालण्यात फार मोठे कष्ट करणार आहोत, पैसे कमवणे हे आमचे उद्दीष्ट नाही.
६. येथे खुसपटे काढलेली चालणार नाहीत, कोणत्याही गोष्टीला नावे ठेवण्यात येवु नये.
७. बिलाच्या दहा टक्के तुम्ही टिप द्यायलाच हवी.
८. येथे जेवायला येतांना तुम्ही धोतर , सदरा, नऊवारी साड्यांसारखे पारंपारीक वेशभुषा करुन येणे अपेक्षीत आहे.
९. आम्ही केलेल्या विनोदाला तुम्हाला हसावेच लागेल.
१०. आम्हाला आमचा व्यवसाय कसा करावा, कसा चालवावा या संबंधी कोणीही काहीही शिकवु नये.

No comments: