Monday, December 20, 2010

Traveller's Tales: Going Shakahari In Style


जेव्हा येवु घातलेल्या नव्या वर्षाचे संकल्प करण्याआधीच संपुष्टात येतात तेव्हा.

या वर्षी पुण्याची पुरते नागवलयं.  खिसा आणि पोट दोन्ही खाली आलयं.

आता यापुढे नविन वर्षी बाहेर उपहारगृहात खाणॆ नाही. अजिबात नाही. बिलकुल नाही, केव्हाही नाही. साफ बंद. बंद म्हणजे बंद.

पुरती वाट लागलीय पैश्याची. कधीतरी आवरायला हवं. खिश्याला पडलेले भलेमोठाले भोक आता बुझवतांना नाकीनऊ येणार आहे.

मग श्री. शंतनु घोष यांची " शाकाहारी " वरील ही पोष्ट वाचनात आली. ठाम निश्चय करण्याआधीच डळमळीत होवु लागलायं.

एकदाच, शेवटचे , या पुढे मग कधीही जाणे नाही. फक्त एकवार. एकदाच येथे जेवायला जावु मग त्यानंतर साफ तोंड आवरायचे.

एकच थाळी. सेट मेन्युची एकच थाळी.

हे हॉटॆल सुरु झाल्यापासुन येथे जेवायला जावुजावु म्हणणारे तुम्ही,अहो राजाभाऊ, कसा काय  तुम्हाला गेल्या आठवड्यात या "शाकाहारी" चा विसर पडला आणि तुम्ही कल्याणी नगर मधल्या रॉयल ऑर्कीड मधे पोहोचलात ? आणि जेव्हा कळाले की "शाकाहारी" चे दर "रॉयल ऑर्कीड " पेक्षा कमी आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटले, सांगा सांगा, राजाभाऊ.

एकच प्याला. एकच थाळी, एकच बफे,

1 comment:

kayvatelte.com said...

एकच प्याला, प्रमाणे राजभाऊंची एकच थाळी.. हा हा हा.. मस्त एकदम.. अहो मी पण हाच ’वसा’ घ्यावा म्हणतोय !