Thursday, December 23, 2010

अचानक

अचानक.
अचानक आयुष्यातुन वेळ कुठे गायब झाला आहे देव जाणे.

त्यात परत
मुंबई ते उपनगर.
उपनगर ते मुंबई.
लोकल ट्रेनचा प्रवास.

या प्रवासात काय कंटाळवाणं आहे हे सांगणॆ कठीण.

हा प्रवास वैतागवाणा की यासाठी रेल्वे स्थानकावर आपल्याला हव्या त्या फलटावर जाण्यासाठी पुल चढणे ? 
 
फलटावरच्या फक्त त्या करणाऱ्याच कळणाऱ्या घोषणा " यह आठ बजकर दस मिनिट की बोरीवली जानेवाली बारा डिब्बे की गाडी है ये मुंबई सेंट्रल , दादर, बांद्रा, अंधेरी के बीच किसीभी स्टेशनपर रुकेगी नही " आणि "हमे खेद है आज आठ बजकर दस मिनीटकी बोरीवला जानेवाली जलद लोकल रद्द्द की गयी है . यात्रींयोंकी असुविधा के लिये हमे खेद है " हे ऐकत बसणे त्रासदायक ?  
 
डब्यात शिरतांना , उतरतांना करावयास लागणारी कसरत, अंगमेहनत, प्रचंड गर्दीत घुसत, वाट काढत हे कंटाळवाणे की  गाडीत होणाऱ्या " अगला स्टेशन दादर, येणारे स्थानक दादर, नेस्ट स्ट्रेसन इज दादर ? याचा  सततचा मारा ?
 
स्थानकाबाहेर रिक्षा मिळावी म्हणुन लावावी रांग किंवा ती मिळावी म्हणुन धावाधाव करत , चरफडत इतरांवर कुरघोडी करण्याचा निष्फळ प्रयत्न का रिक्षाचालकांची ऐकावी लागणारी नकारघंटी ?

आणि स्थानकाबाहेर माणसे ओकण्यासाठी पुल चढतांना होणारी चेंगराचेंगरी ? की माणसे गिळणाऱयां स्थानकाच्या तोंडी जाणे ?

No comments: