Wednesday, December 08, 2010

कितीतरी दिवसांनी

कितीतरी दिवसांनी चांगल्या कथा वाचत असल्याचे समाधान मिळते आहे, वाचनालयात "नवल " दिवाळी अंक जो मिळाला, एवढ्या प्रतिक्षेनंतर.

कितीतरी दिवस कमल देसाईंच्या कथा वाचुया वाचुया विचार करत होतो, आज वाचनालयात "रंग " हाती लागले.

कितीतरी वर्षे नाशिकला जावु, नाशिक फिरु, सुला वाईनरीमधे जावुन वाईनचा आस्वाद घेवु म्हणतोय.  जाण्याची वेळ जवळ येत चालली तसा प्रश्न पडु लागला ,गाडी चालवायचीय तर  पिऊन कसे चालेल ?कितीतरी दिवसांनी आज रात्री अ‍ॅपल पाय खाल्ला, मस्तपैकी. पार्ल्याच्या भटकंतीत नेहरु रस्तावरचे "लोफर " जे सापडले. वरती रात्री आठ नंतर ३० % सवलत. व्हॅनीला आईसक्रीम सोबत हवे होते.

कितीतरी दिवस की कितीतरी वर्षे एरॉस मधल्या "सनडान्स " मधे जेवायला गेलेलो नाही, सबळ कारण काहीच नाही.

No comments: