Wednesday, December 08, 2010

का ?

एखाद्या संस्थेचे तुम्ही अगदी लहानपणापासुन सभासद असता. तुम्ही केवळ सभासदच रहाता. केव्हातरी त्याबद्दल फारसे ममत्व, आपुलकी वाटु नये ?

एखाद्या संस्थेबरोबर तुमचे नाते अगदी अलीकडचे.
पण तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. तुम्हाला ती संस्था फार आवडायला लागते.
आणि गंमत म्हणजे जे पुस्तक वाचावसे वाटते, ते तुमच्या समोर येत रहाते.

श्री.वा.फाटक ग्रंथसंग्रहालय. लोकमान्य सेवा संघ. विलेपार्ले. 
काश वाचनाचा झपाटा पुर्वी सारखा राहिला असता. आणि आयुष्यातला जो वेळ नाहिसा झाला आहे त्याचा जरासा तोल राखता येत असता तर.

No comments: