Monday, December 27, 2010

डोलायमान स्थिती होवुन राहिलीय महामत्स्य महोत्सवात

खावु का नको खावु ? खावु का ? का नको ?
नको ? का जरासे चाखुन पाहुया ?
काय हरकत आहे ? कशाला उगाच ?
आपण मत्स्याहार करत नसले तरी काय झाले ?
आयुष्यभर कितीतरी केलेले पण मोडत आलोय.
एखादा तुकडा.
थोडासा , उगीचच , नावाला चाखायला काय हरकत आहे ?
खावु का नको ?

खायचे झाले तर काय खाऊ ?
कोणत्या स्टॉलवर खाऊ आणि  कोणत्या कोळीणबाईच्या हातचे खावु ?

एकमात्र नक्की].
गरमागरम मऊसुत, पांढरी शुभ्र, मोठाली तांदळाची भाकरी.
ती कोणत्याही परिस्थितीमधे खायचीच खायची.  मग कोरडी का होईना.

अखेरीस राजाभाऊंनी ताव मारला.
आडवा हात चालवला तो उजवीकडच्या शेवटच्या स्टॉलवर अटक मटक चवळी चटक वर. 
चवळीची भाजी, लई टेस्टी भाजी, चटकदार, मटकदार आणि त्या सोबत वेडेपिसे करुन राहिलेली तांदळाची भाकरी.

महाराष्ट्र शासन आयोजीत "महामत्स्य महोत्सव ".
बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स.

उद्याला शेवटचा दिवस.

आता परत एक भेट उद्याला. 

2 comments:

Ap____M said...

ha pan jar modlaat tar .. "ekhada tukda, thodasa, ugichach, navala" .. evadhyawar thambta yeyeel ase waatat naahi!

HAREKRISHNAJI said...

I know. I would have never stopped.