Monday, December 20, 2010

रंग २ आणि रोमराज्य

कधीतरी का कोण जाणे वाटते, हाती घेतलेले पुस्तक पुढे वाचु नये, मग ते अर्धवट वाचुन तसेच ठेवले जाते.

रंग २ -कमल देसाई.

 नाही जमत वाचणॆ.  काहीच कळत नाही आहे का ?

रोमराज्य - मीना प्रभु, 

अलीकडे मीना प्रभुंची प्रवासवर्णने वाचणे कंटाळवाणे वाटायला लागले आहे, ह्या बाई स्थळ पहाता पहाता त्याबद्दल ताबडतोब ऑन लाईन ,  फार सविस्तर लिहीत जातात काय ? कसं काय लक्षात रहाते येवढे सारे ? प्रश्न पडुन राहीला आहे. त्यांच्या सर्व पुस्तकातील वर्णने एकसुरी वाटायला लागली आहेत.

असाच कंटाळा तंबी दुराईंच्या "दोन फुल एक हाफ" चा  येत चालला आहे.  स्थंभ फार लांबत चालला आहे की काय असे वाटायला लागलयं.

No comments: