Saturday, December 25, 2010

मेरी ख्रिसमस.








रात्रीचे दोन वाजुन गेले आहेत.
राजाभाऊ आणि त्यांचा समस्त परिवार मुंबईमधल्या वांद्राच्या रस्तावरुन फिरताहेत, चक्क अंग्रेजी गाणी ऐकत ऐकत.
मस्तपैकी ह्या सिझनची मजा लुटत.
जल्लोश. निव्वळ आनंददायी माहोल.
नुसता आनंद ओसांडुन चालालाय.

मेरी ख्रिसमस.
नाताळाचा शुभेच्छा.
वाटतच नाहीयं रात्रीचा ही ऐवढी वेळ झाली असेल.

माउंट मेरी चा परिसर तर नुसती खिस्तींनी फुलुन गेलायं,
नाताळाची मजा लुटायला, ख्रिसमस इव्ह चे मिडनाईट मास अटेंड करायला. जिवनाची मजा लुटायला. मस्त माहोल.  हवा ही आल्हाददायक. वर्षाचा हा नाताळाचा सण , ही वेळ अगदी छान असते.

किती वर्षापासुनची इच्छा होती.


हॉर्नीमन सर्कलकडच्या सेंट थॉमस चर्च मधे मास ला जायचे, छान पैकी कॅरल ऐकत ऐकत येशुची जन्म वेळ साजरी करायची.
आज ती पुरी झाली.

आजची रात्र मुंबई काही झोपणे नाही.
मुंबईचे हे रात्रीचे रुप काही अलगच आहे.

मेरी ख्रिसमस.

No comments: