Saturday, December 25, 2010

ये दिल मांगे मोर

अजुन कापा, अजुन , अजुन , आणखी एक. गरमागरम कोळश्यावर भाजलेले  साकरीया, मस्त गोड रताळे आणि वरती भुरभुलेला मसाला. जरासे लिंबु पिळले असते ना तरी चालले असते.

या थंडीच्या दिवसात गाडीवर ही भाजलेली रताळी कोठे मिळतात याचा राजाभाऊ शोध घेतच असतात पण जेव्हा जे हवे असते  ते अवचितपणे, नकळतपणे, ध्यानीमनी नसतांना समोर येते तेव्हा बसलेला सुखद धक्का फार चवदार, रुचकर व लाजबाब असतो.

No comments: