तर पेडगावच्या शहाण्यांना घरी स्वस्थ बसणे नाही.
आता पुण्यातुन बाहेर पडायला अनेक रस्ते आहेत त्याला काय करायचे ? सातारा रस्ता, नगर रस्ता, नाशीक रस्ता, सोलापुर रस्ता, मुंबई रस्ता, कुठलीतरी दिशा धरायची आणि सुटावे. सोबत गाडी आणि ती व श्री.सुरेश परांजपे सारखी माहितगार व्यक्ती. सबंध आडव्या उभ्या महाराष्ट्रात एकही असा डोंगर नसेल, डोंगरमाथा नसेल, गाव नसेल, स्थळ नसेल , कानाकोपरा नसेल , धनगरपाडा नसेल, गवळी वाडा नसेल, खिंड नसेल वस्ती नसेल जेथे ते गेलेले नाहीत किंवा त्याची त्यांना माहिती नाही.
मग काय. ते एके दिवशी निघाले पेडगावला बहादुरगड बघायला. पेडगावचा भुईकोट किल्ला. महाराजांनी केलेली औरंगझेबाच्या या दुधभावाची फटफजिती, त्या किल्ल्यात पुरातत्व खात्याला उत्खन्नन करतांना सापडलेली पुरातन मंदिरे.
सिध्दटॆकच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गाडी वळली ती पेडगावच्या रस्तावर. पंधराएक कि.मी. गेल्यावर मात्र त्यांच्यी पुढे जाण्याची छाती झाली नाही, रस्तादुरुस्तीची कामं चाललेली. हे मोठाले फोडलेले दगड रस्तावर पसरुन ठेवलेले. आडवाटेवर गाडीला काय झाले तर मोठी आफतच. हा अनुभव लक्षात गेता भीमेच्या किनारी असलेल्या काष्टी गावातील वरदविनायकाच्या देवळात जाण्याचे मग रस्ता कसा असेल नी कसा नाही या विचाराने त्यांनी टाळले.
संध्याकाळी परततांना नारायण महाराजांच्या केडगाव बेट ला जाण्याचे मात्र आवर्जुन जाणे झाले.
"बेट" चा आश्रमाचा परिसर मस्त आहे. आतमधले प्रशस्त दत्त मंदिर, मन प्रसन्न करुन सोडणारे, सभोवताली छोट्याश्या टॆकाडावर चढुन गेल्यावर असणारी माळरानं, त्यामधली हरणं. पण सुर्याला नेमके त्याच वेळी मावळायचे होते.
आश्रमात रहाण्यासाठी बंगले मिळतात. ( आतमधे ते कसे आहेत याची कल्पना नाही ). तेथे जावे , निवांत रहावे व आजुबाजुच्या टेकाडांवरुन मस्त पैकी भटकावे. चौफुल्याजवळ मोरगावच्या वाटॆवर हे स्थळ आहे.
आयुष्यातली एक मस्त संध्याकाळ.
No comments:
Post a Comment