Sunday, December 05, 2010

रामदरा

आजच आनंद माडगूळाकरांचा "माझे बदलते गुरु " हा लेख वाचला. त्यात त्यांनी ते सी.रामचंद्रकडे गाणे शिकायला जायचे तेव्हा एक जण मिरजेवरुन शिकायला यायचा असा उल्लेख आहे.

आता राजाभाऊंचा मुलगा गिटार शिकायला पार मिरजेपर्यंत जात नसेल पण घर ते मगरपट्टा हे अंतर काही थोडके नव्हे आणि तेही जेव्हा पी.एम.टी च्या बस बदलत बदलत जावे लागते तेव्हा. त्यानी आपला गुरु बदलण्यास नकार दिला, बाजुच्या इमारतीत रहाणारा " क्रीस " मगरपट्टयाजवळ  कुठेतरी आतल्या भागात राहायला गेला म्हणुन काय झाले ?  

आज राजाभाऊंना त्याची दया आली व ते त्याला सोडायला गेले. आता या मधल्या तासांचा सदुपयोग कुठे करायचा ?

लोणीकाळभोर जवळील "रामदरा" ला जाण्याची पार पुरातन  त्यांची तिव्र इच्छा आज पुरी झाली. 
मस्त ठिकाण.

देवळात देवदर्शन घेण्यासाठीच जायचे असते असे थोडेच असते  ?

No comments: