Sunday, December 05, 2010

स्टाटर्स ते श्रीखंड व्हाया सॅलॅडस, सयाजी मधे

राजाभाऊ, ब्बास पुरे झालं आता, हात जरा आवरता घ्या.
राजाभाऊंनी आपल्या मनाला फटकारले. आज आपल्या मनाला त्यांनी जरा जास्तच दटावले.
अहो, राजाभाऊ, स्टाटर्स ते श्रीखंड व्हाया सॅलॅडस या खाद्यप्रवासात अजुन पर्यंत किती तरी टप्पे बाकी आहेत, एकीकडेच तुम्ही एवढा वेळ रेंगाळत राहिलात तर सर्व पदार्थांना तुम्ही कसा काय न्याय मिळवुन देणार ?




त्यांनी स्वत:ला विचारलं.

राजाभाऊ या वेळी एक नविन धडा शिकले.



श्रीखंड हा पदार्थ मुख्य जेवणात तर हाणण्यासारखाच असतोच याबद्द्ल वाद नाही पण त्यापेक्षा जास्त तो डेझर्ट्स म्हणुन खाल्यावर अधिक चांगला लागतो.

तसेच आज त्यांची पुरी खात्री पटली की त्यांचा मुलगा अतिशय नालायक आहे, बफेला नेण्याचा लायकीचा नाही, जो मुलगा सेनापती बापट रस्तावरील मेनलॅंड चायना मधे गेल्यानंतर मागव मागव मागवत बील फुगत फुगत फुगवत नेतो तोच बफे जेवणाच्या वेळी अचानक आखडु कसा होतो, कंजुषी कुठला. राग येतो त्याचा अश्यावेळी. परत काय सांगण्याची सोय नाही.
यावेळी पुण्याच्या सयाजीला काय झाले होते देव जाणॆ, आतापर्यंत एवढ्या वेळा तेथे गेलो असु, पण त्यामधे आजचा जेवणाचा बेत मोठा खासा होता.

अप्रतिम. बढीया.
जर पुण्यात मस्तपैकी बफे कुठे जेवायला जायचे असा सल्ला जर का कोणी राजाभाऊंना विचारला ( जो कधी कोणी विचारण्याच्या फंदात पडत नाही, उगीच कशाला ...... ) तर ते प्रथम "सयाजी" चे नाव घेतील. एक तर इतरांच्या मानाने स्वस्त आणि तरी देखील मस्त, अनेक प्रकारच्या पदार्थांनी खच्चुन भरलेला, काय खावु नी काय नाही असे होते.
आणि हो मग कोर्टयार्ड मॅरीयट्स, रॉयल ऑर्चीड्स, इंडुज किचन यांचे पण पुढे नाव घेतले जाईल.

"हवे तेवढे खा " हे जरी असले तरी पोटाला जेवतांना पण कधी तरी थांबायलाच लागते.

1 comment:

मुक्त कलंदर said...

सयाजीला मिपाचा एक कट्टा झाला होता आणि तेव्हा आम्ही मंडळी स्टार्टरवर असे तुटून पडलो होतो की मेन कोर्स राहिला बाजूलाच. फक्त स्टार्टर आणि डेझर्ट यांच्यावरच आम्ही पार्टीची सांगता केली..