Tuesday, December 07, 2010

आमचे पुण्याचे आमदार

आमचे पुण्याचे मा. आमदारसाहेब, ओ हो हो. फार भाग्यवान, काय नशिब घेवुन जन्माला आले, वा वा , नशिब फळफळले म्हणायचे, किस्मत का दरवाजा समजो खुल गया , नशिब रे नशिब. जबरदस्त तकदीर.

यांचा जन्मदिवस आणि मॅडमचा, सोनीयाजींचा, साक्षात सोनीया मॅडमचा एकाच महिन्यातला, वा वा वा, काय योगायोग म्हणायचा.

साऱ्या साऱ्या झाडुन साऱ्या पुण्यात त्याची दवंडी पिटली ना.

पुर्वेपासुन दक्षिणेपर्यंत, दक्षिणेपासुन उत्तरेपर्यंत्, उत्तरेपासुन ते अवघ्या दिशा या योगायोगाची अमुल्य माहिती समस्त पुणेकरांना देण्यासाठी फ्लेक्सच्या फलकांनी भरुन गेल्या, एकीकडे मॅडमचा फोटो त्यासोबत यांचा, यांचा फोटो एका कोपऱ्यात , वरच्या कोपऱ्यात सोनीयाजींचे अभिष्ट्चिंतन, वाढदिवसाच्या निमित्ते शुभेच्छा, ह्यांच्या कडुन , त्यांच्याकडुन, स्वताःकडुन आणि आमच्या कडुन सुद्धा.

खरं म्हणजे हे फलक पार दिल्लीपर्यंत लावायला हवे होते, सोनीयाजींना कळायला नको का आपल्याबरोबर आणखी कोणाचा जन्मदिवस डिसेंबरातला ते ?

No comments: