Thursday, July 07, 2011

पोळा उसळ आणि आस्वाद.

आस्वादनी आपल्या दाराच्या वरती "पुनरागमनायच " काय लिहीले आणि राजाभाऊंनी तेथे वारंवार जायला सबब काय मिळाली.

योको सिझलर्स की आस्वाद मधे पोळा उसळ या मधे निवड अर्थात पोळा उसळीचीच झाली हे सांगायला नको. आणि सोबत नारळाचे दुध.


Wednesday, July 06, 2011

ते लाभे या झोपडीत माझ्या

या फोटोवर एक अप्रतिम कविता लिहुन पाठवली आहे ते 

Ugich Konitari has left a new comment on your post "ते लाभे या झोपडीत माझ्या":

थंडगार वातानुकुलीत गाडीत
गियर बदलत
पावसाळी खड्यातून
बाहेर पडून
आसमांतले धुके बघत
हिरवाइत बुडून
मैलोमइल हिंडून
ते चहाच्या शोधात असतात .....
आणि
रोजच
वातानुकुलीत डोंगरातून
लाल बस ने शाळेतून घरी येउन
एका पक्क्या घरामागे
म्हशीची धार काढून
टप टप गळणार्या झोपडीत
चुलीशी बसलेल्या आपल्या आईला
नेउन देउन
सगळ्यान बरोबर चहाची वाट बघणारी
हि दरवाज्यातील चंद्रमुखी ..... 



बापदे्व व पिकॉक बे

बापदेव - एक मस्त घाट.
पुण्याच्या अगदी म्हणजे अगदी जवळ.
मस्त पावसाळी माहोल. आल्हाददायक, चित्तवृत्ती प्रफुल्लीत करुन सोडणार्रे वातावरण. हवेमधे भरुन राहिलेला गारवा आणि जेथे पहावे तेथे फक्त हिरव्या रंगाचे गालीचे.

रस्ताचे नुतनीकरण नुकतेच झालेले. गुळगुळीत मस्कासारखा रस्ता.
खाली पसरलेले पुणे वरती घाटावर आपण. मजा आली लॉंग ड्रायव्हींगला.
सोबत ती. पण म्यान केलेला कॅमेरा. उगीच भिजुन हा तरी खराब व्हायला नको करत.

आपल्या घराजवळ एवढा मस्त रस्ता आहे पिकॉक बे व त्या पुढचा आणि राजाभाऊ तुम्हाला तो ठावुक नसावा ?
परतण्याची घाई नसती तर आणखीन पुढे जाण्याचा बेत होता.
आता जरा चांगला पाऊस होवु द्या, गाडी ह्या दिशेने वळवलीच समजायचे.

Tuesday, July 05, 2011

टॉपलेस





Posted by Picasa

वांद्रेच्या रस्तावर एक फेरफटका



मस्त पावसाळी माहोल. ताम्हीणीतुन एक रस्ता लोणावळ्याजवळील भांबुर्डॆला जातो . म्हटंल चला मुंबईला जातांना हा मस्त रस्ता धरु.

वांद्रेपर्यंत या रस्ताचे उत्तम डांबरीकरण झालेले आहे. पण त्यापुढचा १२ कि.मी. रस्ता म्हणावा तसा बरोबर झालेला नाही, कामं चालु आहेत. तसा अर्धाकच्चा आहे. या रस्तावरुन मोटरसायकल वरुन जाणारे भेटले.

एकदोन कि.मी. पुढे खाडखुड करत पुढे गेल्यानंतर मग राजाभाऊ मागे फिरले.
सुसाळे तसेच अंधारबनात जाण्याचा मार्ग बहुदा याच रस्तावर आहे.

Monday, July 04, 2011

बटाटा भजी, गरमागरम बटाटा भजी आणि शिवाजी पार्क

शिवाजी पार्क मैदानाला फेरी, फेऱ्या मारतांना राजाभाऊंनी ठामपणॆ ठरवले.

चालतांना अजिबात इकडेतिकडे, आजुबाजुला पहायचे नाही. डोळॆ , मान अजिबात जरासुद्धा वळवायची नाही. घोड्याला जशी झापडं बांधतात अगदी तशीच बांधल्यागत नजर समोर ठेवुन नाकासमोर सरळ चालायचे. लक्ष म्हणुन विचलीत होवुन द्यायचे नाही.

पण.

"एक भजी पाव द्या."
समाधान नाही. पावामुळॆ बटाटाभज्याची, गरमागरम बटाटाभज्याची चव कळली नाही की काय ?

"अजुन एक प्लेट भजी द्या. पाव नको. "
मस्त आहेत, आवडली. अगदी छानच.

"मालक, भजी आवडली. खुप आवडली , एखादी आणखीन प्लेट खायला हरकत नाही "

राजाभाऊ, राजाभाऊ थांबा की आता, आवडली म्हणुन काय तीन तीन प्लेट. एकीकडॆ शंभराला धडक्या देवु पहाणाऱ्या वजनाला काबुत आणण्यासाठी चालायचा प्रयत्न करावा व चालताचालता अचानक थबकुन मान बाजुला वळवुन, तिरके डोळे करुन हळुच मनाला फसवत भजी हाणावीत ?

महाराष्ट्र कबड्डी महासंघाच्या इमारतीच्या बगलमधे मैदानात उघड्यावर एक छोटेसे बटाटावडा, बटाटाभजी इ.इ. खाण्यासाठी एक जागा आहे.

Wednesday, June 29, 2011

खरचं कमाल आहे. कसं काय जमते यांना ?

का पण का ?

राजाभाऊ तुम्ही एक गोष्ट प्रामाणिकपणॆ सांगा तेवढेच एक कारण होते की आणखीन काही  ज्या मुळॆ तुम्ही जेवायचे टाळलेत ?



संत म्हणती क्षण मोहाचा टाळा

मोह फार वाईट .
 फारच वाईट.
आता  वारकऱ्यांच्यासाठी बनवलेली ही अशी चमचमीत, रस्सेदार भाजी पाहिल्यावर ती एखाद्याचा विश्वामित्रच होणे स्वाभाविकच.
त्यात परत सेवाभावी वृतीने वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांचा आग्रह. थोडेसे तरी जेवा.

पण

भरल्यापोटी घरी परतल्यावर ज्या काही शिव्यागाळी खायला लागल्या असत्या त्या ध्यानी घेता राजाभाऊंनी मनी निग्रह करुन स्वतःला या पासुन दुर ठेवले.

बायकोने केलाला जंगी बेत. त्याच भावनेने खास राजाभाऊंसाठी.खास वालाची खिचडी, काजुची भाजी.

Monday, June 20, 2011

असतं एकेकाचं नशिब

मुंबई मधे जन्मलेल्या शेफ फॉईड कार्डोझ यांना  America’s much-watched “Top Chef Masters” contest मधे  USD 100,000 चे प्रथम पारितोषक मिळाले. 


त्यांनी बनवलेला खाद्यपदार्थ होता


"उपमा"




तिने बनवलेला खाद्यपदार्थ होता
"उपमा"
तोच उपमा मस्तपैकी खोबरेबिबरे पेरलेला.


तिलासुद्धा बक्षिस मिळाले. 


राजाभाऊंनी आणि तिच्या मुला कडुन.


" तुला कळत कसं नाही ? 
तुला दुसरे काय बनवता येत नाही ? 
तुला माहिती नाही आम्हाला उपमा आवडत नाही ते ? 
जगात एवढ्या डिश असतांना तुला काय फ‍क्‍त उपमाच बनवता येतो ?
दुसरे काय बनवायला शिकवले नाही काय ? इ.इ,इ, "


झक मारले आणि  आपण ह्यांच्या साठी नास्ता बनवतो असे नक्कीच तिला वाटले असणार ?

Tuesday, June 14, 2011

अलिखित - सचिन कुंडलकर

काही काही वाक्य बराच काळ लक्षात रहातात. 

सारे चर्चेचे गुर्‍हाळ जे साध्य करु शकले नसते ते सचिन कुंडलकरांच्या एका वाक्याने साध्य व्हावे  आणि  गहाण ठेवलेले डोके त्वरीत जागेवर यावे,  भुरळ घातले गेलेले डोळे खाडकन उघडावेत. 

" भगव्या वेशातील एका करोडपती योगगुरुंकडून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणा आपण समजुन घेणार असू, तर आपल्यात आणि मुल्ला-मौलावींच्या इशाऱ्याने चालणाऱ्या देशांमधे काहीही फरक उरणार नाही "

अतिथी डायनींग हॉल

केव्हा केव्हा सरकारला कठोर पावले उचलुन आपल्या अस्तिवाची जाणीव करुन द्यायला लागते. अगदी तसचं. केव्हा तरी राजाभाऊंना आपलेही स्वतंत्र अस्तित्व जाणवुन द्यायला लागते, मग सर्वांची पावले मुकाट्याने साधे, घरगुती जेवण जेवायला जाण्यासाठी वळु लागतात. 

आणि हे "अतिथी डायनींग हॉल " मधले हे जेवण व त्यातला आमटीभात पाहिल्यावर कोणता मुलगा "मी जेवणार नाही, मी उपाशी राहीलो तरी चालेल " हा बालहट्ट करत राहिल ?

( सरकारनेही ह्या पासुन काही तरी शिकावे. कोणी  आमरण उपोषणाला बसला रे बसला की त्याच्यासमोर गरमागरम, वाफाळलेला मऊसुत आमटीभात ठेवावा किंवा ठेवावा वरणभात सोबत गोडयालिंबाच्या लोणच्याची एखादी फोड आणि वरती घरगुती शुद्ध तुपाची धार सोडलेली. 
काय कोणाची बिशाद आहे आपल्या हटवादी स्वभावाला चिकटुन रहाण्याची ? )



पुण्यामधे घर होण्याआधी "नंदनवन " मधे रहाणे आणि अतिथीत जेवणे. तेव्हा पटवर्धन हे डायनींग हॉल चालवत असतं. राजाभाऊंच्या बायकोच्या मते तेव्हा जेवणाची मजा काय और होती. 
पटवर्धन आत्ता ते कुठे गेले आहेत देव जाणे. त्यांच्या नावाचा बोर्ड अलकासमोरील एका बंद दुकानावर दिसतो खरा. 

चालतच राहते, ती चालतच राहते ....

जेव्हा राजाभाऊंनी हे फोटो काढले तेव्हा त्यांच्या नजर्रसमोर श्री. ४२० मधला नर्गीस व राजकपुरचा पावसातील् सीन होता.

पण तसे झाले नाही.

जेव्हा ही Suranga Date यांनी या फोटोवर रचलेली एक अप्रतिम कविता वाचली तेव्हा जाणवले की या प्रसंगाला आणखीही कंगोरे आहेत-

पायाखाली रखरखीत जमीन ,
काहीतरी उगवल्याचा भास देणारे गवत,
आणि आई पृथ्वी,
निळ्या आभाळाच्या छत्राखाली
थोडा गारवा अनुभवत
संथ पायपीट करते ....
घरातला मिळवता सूर्य
तिला त्याच्या मागे मागे
आणि भोवताली फिरवतो ;
आयुष्यातले ऋतू बदलतात ,
कधी तो तळपतो ,
की कोणाला ग्रहण लागतं,
कधी तो तिचे श्रम ओळखून
ढगामागे तोंड लपवतो ....
पण ती
चालतच राहते, ती चालतच राहते ....





छत्री एकच पण ......................


Sunday, June 12, 2011

कॅफे बे लीफ - हॉलीडे इन - पुणॆ

आज राजाभाऊंनी सर्वात जास्त कोणती गोष्ट एन्जॉय केली असेल तर ती हे ग्रेट आर्टीस्ट ज्या नजाकतीने बुफेतील साऱ्या डेलीकेट पदार्थांची रचना करताहेत, मांड्णी करताहेत ही, त्यात विशेषता सॅलॅडस व डॆसर्ट्स ह्याची.

ह्या बल्लावाचार्यांची त्या क्षणासाठी तुलना  करायचीच झाली तर ती तन्मयतेने चित्र रंगवणारा एखादा चित्रकार किंवा मुर्ती घडवतांना देहभान विसरलेला एखादा शिल्पकार.





 हॉलीडॆ इन.

दुपारचे पावणे बारा वाजलेले. अजुन नानाविध खाद्यपदार्थांनी सजलेले, नटलेले बुफे सुरु व्ह्यायला पाऊण तास आहे.  ह्याच वेळी नेमके राजाभाऊंचे लक्ष ह्या साऱ्या कलावंतांवर गेले. मग काय त्यांची देहबोली, त्यांच्या हालचाली, त्यांचे निटनेटकेपणा, टापटीपपणा, प्रत्येक डिश नी दिश, प्रत्येक ग्लास लावतांना घेतली गेलेली काळजी.  प्रत्येक गोष्टीतले  perfection.

आजचे खाल्ले गेलेले खाद्यपदार्थ. (भीमाची कसम , हे सच आहे )

Cream of Asparagus Soup , सोबत नानाविध पाव.

Salads - Roasted Potato with Garlic mayonnaise , Pasta salad, Baby Corn & Tomato Salad , Garden      Green Salads. with lot's n lot's of fruits.

Main course -
 (Indian ) Makhamali Paneer ( Excellent ) , Dhoodi Channa , Aloo Capsicum. Mushroom Mutter

Western - Cajun Potato Wedges , Baked Corn and peas, Caponate, Herb tossed vegetables

Oriental - Black bean veg,

Staples -  Biryani, Hakka Noodles.

Dal - Dal Makhani / Dal Tadka

Desserts - Creme caramel, Creme Brulee, Raising Pudding, Green Tea , Bevarian Cream , Mixed fruit pie, Chocolate cake slice, Fruit tart, Apricot Jelly, Banana Custard, Kiwi Parfait, Banana Mousse , Strawberry Tart, Caramel Cooler.

आता बास करत न खाल्लेले - सेमीया खीर आणि सुजी हलवा.



दर - रु.३५० + कर.






ते तुमच्या वर लक्ष ठेवुन आहेत