Monday, July 04, 2011

बटाटा भजी, गरमागरम बटाटा भजी आणि शिवाजी पार्क

शिवाजी पार्क मैदानाला फेरी, फेऱ्या मारतांना राजाभाऊंनी ठामपणॆ ठरवले.

चालतांना अजिबात इकडेतिकडे, आजुबाजुला पहायचे नाही. डोळॆ , मान अजिबात जरासुद्धा वळवायची नाही. घोड्याला जशी झापडं बांधतात अगदी तशीच बांधल्यागत नजर समोर ठेवुन नाकासमोर सरळ चालायचे. लक्ष म्हणुन विचलीत होवुन द्यायचे नाही.

पण.

"एक भजी पाव द्या."
समाधान नाही. पावामुळॆ बटाटाभज्याची, गरमागरम बटाटाभज्याची चव कळली नाही की काय ?

"अजुन एक प्लेट भजी द्या. पाव नको. "
मस्त आहेत, आवडली. अगदी छानच.

"मालक, भजी आवडली. खुप आवडली , एखादी आणखीन प्लेट खायला हरकत नाही "

राजाभाऊ, राजाभाऊ थांबा की आता, आवडली म्हणुन काय तीन तीन प्लेट. एकीकडॆ शंभराला धडक्या देवु पहाणाऱ्या वजनाला काबुत आणण्यासाठी चालायचा प्रयत्न करावा व चालताचालता अचानक थबकुन मान बाजुला वळवुन, तिरके डोळे करुन हळुच मनाला फसवत भजी हाणावीत ?

महाराष्ट्र कबड्डी महासंघाच्या इमारतीच्या बगलमधे मैदानात उघड्यावर एक छोटेसे बटाटावडा, बटाटाभजी इ.इ. खाण्यासाठी एक जागा आहे.

No comments: