Saturday, July 23, 2011

सारे काही अनलिमिटेड सांबार व चटणी साठी

"वाईट, एकदम वाईट."
राजाभाऊ म्हणाले.
"बंडल अगदी बंडल "
राजाभाऊंची बायको म्हणाली.
लग्नानंतर प्रथमच तिला आपल्या नवऱ्याचे म्हणणे पटले असावे.

"मी काय मागवले असेल ? ओळख पाहु "
राजाभाऊंनी विचारले.
"रवाडोसा, ऑनीयन रवा डोसा, मागवशील व नंतर खाता खाता नावंही ठेवशील "
जेथे आपणच अजुन स्वःताला ओळखलेले नसते तेथे या बायका कसंकाय आपल्या नवऱ्याला चांगलेच जाणुन असतात ?

बायकोचे न ऐकल्याचा हा सारा परिणाम. रात्रीचे जेवण जेवायला तिला जायचे होते ठाकुरद्वारी तांबेंकडॆ. पण गिरगावात गाडी उभी करण्यासाठी जागा शोधण्याची शारीरीक व मानसीक तयारी नसल्यामुळे गाडी वळली " स्टेटस " कडॆ, केवळ येथे मिळणाऱ्या अमर्यादीत सांबार व चटणीसाठी. मग तुम्ही त्या सोबत काहीही खा ना, ते तर दुय्यम.

ऑनीयन रवाडोसा समोर आला, ऑनीयन उत्तपा समोर आला. रंगरुप पाहुनच आता आपल्यापुढे काय ताट वाढुन ठेवलेले आहे ह्याची कल्पना आली. ना रंग ना रुप, ना चव ना ढव.  आतमधे कच्चा. 

आता आपलाच अट्टाहास असल्यामुळे राजाभाऊंना आपल्या बायकोवर चिडण्यासाठी काहीही सबब मिळाली नाही. 

खाण्याचा निष्पळ प्रयत्न, दोघांनीही अर्धवट सोडलेला. 

पुर्वीसारखे "स्टेटस " एकंदरीत राहीलेले नाही. हा अनुभव पुर्वीही आलेला. अनुभवाने शहाणे होणे नाही. 

तरी बरे संध्याकाळी ते दादरला आस्वाद मधे गेले होते. अगदीच उपाशी पोटी रहायला लागले नाही.  


No comments: