Tuesday, July 05, 2011

वांद्रेच्या रस्तावर एक फेरफटकामस्त पावसाळी माहोल. ताम्हीणीतुन एक रस्ता लोणावळ्याजवळील भांबुर्डॆला जातो . म्हटंल चला मुंबईला जातांना हा मस्त रस्ता धरु.

वांद्रेपर्यंत या रस्ताचे उत्तम डांबरीकरण झालेले आहे. पण त्यापुढचा १२ कि.मी. रस्ता म्हणावा तसा बरोबर झालेला नाही, कामं चालु आहेत. तसा अर्धाकच्चा आहे. या रस्तावरुन मोटरसायकल वरुन जाणारे भेटले.

एकदोन कि.मी. पुढे खाडखुड करत पुढे गेल्यानंतर मग राजाभाऊ मागे फिरले.
सुसाळे तसेच अंधारबनात जाण्याचा मार्ग बहुदा याच रस्तावर आहे.

2 comments:

Punam Raut said...

Mast ahe jaga, Punyapasun kas jaych ithe? kiti km ahe punyapsun?

HAREKRISHNAJI said...

ही एक नितांत सुंदर जागा आहे. ताम्हीणी घाटातील प्लस व्हॅलीचे दर्शन , समोरील डोंगरात भरपुर धबधबे, जरा पुढे गेले की भरुन वहाणारे एक लहानसे धरण. ढग आणि पाऊस.

पुण्यापासुन पन्नाससाठ कि.मी. वर ही जागा असावी. चांदणीचौकातुन पौंड चा रस्ता पकडायचा. ताम्हिणी घाटाच्या रस्तावर एक उजवीकडे जायला पुल लागतो त्यावरुन वांद्रे गावाच्या रस्ताला लागायचे. वळल्यानंतर १५-२० मिनिटात ही जागा येते. अजुनपर्यंत फारश्या जणांना ही जागा माहित नाही त्यामुळे फारसी गर्दी नसते.