बापदेव - एक मस्त घाट.
पुण्याच्या अगदी म्हणजे अगदी जवळ.
मस्त पावसाळी माहोल. आल्हाददायक, चित्तवृत्ती प्रफुल्लीत करुन सोडणार्रे वातावरण. हवेमधे भरुन राहिलेला गारवा आणि जेथे पहावे तेथे फक्त हिरव्या रंगाचे गालीचे.
रस्ताचे नुतनीकरण नुकतेच झालेले. गुळगुळीत मस्कासारखा रस्ता.
खाली पसरलेले पुणे वरती घाटावर आपण. मजा आली लॉंग ड्रायव्हींगला.
सोबत ती. पण म्यान केलेला कॅमेरा. उगीच भिजुन हा तरी खराब व्हायला नको करत.
आपल्या घराजवळ एवढा मस्त रस्ता आहे पिकॉक बे व त्या पुढचा आणि राजाभाऊ तुम्हाला तो ठावुक नसावा ?
परतण्याची घाई नसती तर आणखीन पुढे जाण्याचा बेत होता.
आता जरा चांगला पाऊस होवु द्या, गाडी ह्या दिशेने वळवलीच समजायचे.
2 comments:
aamachyasarakhya punyabaheril vachakansathi ya ghatachi aani rastyachi thodi jasta mahiti dili tar bare hoil.
बापदेव घाट हा पुणे -सासवड रस्तावर आहे. कात्रजच्या चौकातुन एक रस्ता हडपसर - देवाची आळंदी येथे जातो, या रस्तावरुन खडीमशिन चौकातुन उजवीकडे वळल्यावर लागलीच हा घाट येतो.
घाट फार मस्त आहे. आहे तसा छोटासाच.रस्ता नविनच झाल्यामुळे चांगला आहे. वरती देऊळे वगैरे आहे तेथे बसुन वेळ घालवु शकतो. जातांना मी या रस्तानी सासवडला गेलो व येतांना पुरंदर, नारायणपुर (एकमुखी दत्त ) -केतकावळे ( बालाजी मंदिर ), या घाटातुन परतलो. किंवा सासवडवरुन परततांना दिवाघाटातुन पण येवु शकतात.
खडकवासला धरणावरुन एक रस्ता एन.डी.ए. कडे जातो व तो वारजेला बाहेर पडतो. उजवीकडॆ न जाता डावीकडे वळल्यावर पुढे पिकॉक बे हे ठिकाण आहे. हा सर्व मिलीटरी भाग आहे. हा रस्ता पुढे टेमघर धरण / लवाड्याला जातो. वेळेअभावी मी पुढे जावु शकलो नाही. हा रस्ता लॉंग ड्राईव्हला छान आहे.
ताम्हीणी घाट आपल्याला माहिती असेलच. हा माणगावला उतरतो. रस्तात मधे वळल्यानंतर भीरा पॉवर हाऊस लागते. धरण परीसर व नदी अतिशय नयनरम्य आहे. भीराला महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. हा रस्ता पुढे पाली ला ( अष्टविनायक ) बाहेर पडतो. वाटेत रवाळजे धरण आहे, ते ही पाहण्यासारखे आहे.
ताम्हीणीमधुन एक रस्ता लोणावळ्याजवळील आय.एन.ऐस. शिवाजीच्या पुढे घुसळखांब नामक गावाकडॆ जातो. तो पण मस्त आहे. मी पलीकडच्या बाजुने अर्धा रस्ता गेलो होतो. बाजुला सतत मुळशी तलाव लागतो. वाटेत तलावात सुसाळे नामक बेट आहे मी तेथे एक रात्र मुक्काम केला होता. वरती चार-पाच घरे आहेत. व गावकऱ्यांनी त्यांच्या होडीतुन सोडले होते.
आणखीन एक रस्ता लोणावळ्याजवळील भांबुर्डॆ गावात वांद्रे मधुन जातो. त्याचे मी फोटो टाकले आहेत. तैलबैला भांबुड्रे जवळ आहे. वांद्रे ते बांबुर्डॆ रस्ताचे काम सुरु आहे.
आणाखीन काही माहिती हवी असल्यास मला जरुर लिहा.
ह्या भांबुर्ड्या जवळ धनगड आहे तो रस्ता (पायवाट ) खोगीर खिंडीतुन खाली पालीजवळील पाच्छापुरच्या वाडीत उतरतो. चालत जायला मस्त आहे. वाटेत सतत तैलबैला, पुढे सुधागड दिसत रहातो. रात्री एका धनगरपाड्यात मुक्काम करायला लागला होता.
Post a Comment