Sunday, July 17, 2011

द बे लीफ - हॉलीडॆ इन , पुणे

आपल्या निश्चयाच्या भिंती कधी तरी ढासळणार , संयमाचे बुरुज एकएक करत कोसळत रहाणार , आणि ते ही कोठे याची राजेशभाईंना चांगलीच कल्पना होती. पण त्याच्यासाठी ते कोणता बहाणा करतील, कोणते कारण शोधतील याची कल्पना तिला नव्हती.

"एकच घास , फक्‍त एकच "

आठवडाभर केलेले डायटींग . केवळ वजन कमी करण्यासाठीचे. आणि वाढलेले वजन परत पुर्वपदावर आणण्यासाठीचा एक कमकुवत (आपलं म्हणायला ) क्षण.

एखाद्या दुकानात, हॉटेलमधे, एकाद्या जागी आपण परत परत का जात रहातो याचे एक कारण म्हणजे त्या ठिकाणच्या कर्मचारीवर्गांनी घेतलेल्या आपल्या अस्तित्वाची दखल,  दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही जेव्हा जातात तेव्हा त्यांनी तुम्ही येथे आधीही येवुन गेल्याची ठेवलेली आठवण , एक ओळखीचे स्मित हास्य व  तुम्हाला दिलेली चांगली वागणुक.

अगदी याच याच कारणासाठी हॉलीडे इन मधल्या "द बे लीफ " च्या प्रेमात राजेशभाई न पडतील तर नवलच.

एक तर या ठिकाणी असलेला सर्वोत्तम बुफे त्यांना नेहमीच साद घालत आलेला त्यात परत मुंबईला परततांना वाटेवरचेच हे ठिकाण. एकदम सोईचे. सर्वोत्तम अंतर्गत सजावट, पुलसाईड ला असलेले रेस्टॉरंट. खुप मोठा स्प्रेड.

पुण्यानी राजाभाऊंना स्पॉईल केले आहे हे मात्र अगदी खरं.आज जेवणात गुजरात्यांचे फरसाण,ढोकळा, भाकरवडी, इ.इ. देखिल होते. जे टाळले गेले.

आज त्यांना आपल्याकडॆ आलेल्या वडलांचे निम्मित्त मिळाले, पुढच्या वेळी ते कोणता बहाणा करतील ?