Thursday, August 12, 2010

नकार द्या., नकार द्या.

आज ग्राहकांनी रिक्षाटॅक्सीत बसायला नकार दिला.

आता त्या धर्तीवर

खड्डे, महाप्रचंड खड्डे पडलेल्या, उखडलेल्या, पदपाथ नसलेल्या, फेरीवाल्यांनी व्यापलेल्या, उघडी, झाकणे नसलेल्या , थेट पाताळाची वाट दाखवणाऱ्या गटारे असलेल्या, सांडपाणी भरुन वाहणाऱ्या , घाणीने भरलेल्या, कचऱ्याने तुंडुंब भरलेल्या, पेव्हर बॉगनी सत्यानाश केलेल्या , साधा रस्तापार करण्यासाठी वहातुक बंद करण्याके सिग्नल नसलेला, झेब्राक्रॉसींग नसलेला, असल्यास वहानचालकांनी आपली वहाने उभी करुन अडवलेल्या , पादचाऱ्यांच्यासाठी अत्यंत असुरक्षित असलेल्या, रस्तावरुन ,

एक दिवस, फक्त एक दिवस, चालण्यास रोज जीव मुठीत घेवुन चालणाऱ्या पादचाऱ्यांनो नकार द्यावा.

नको हो नको,

नको हो नको,

नका, नका, नगरसेवकांना, आमदारांना या मलेरियानिर्मुलनासाठी रस्तावर उतरण्याचे आदेश देवु नकात, त्यांना कामाची आणि विशेषता या अश्या कामाची सवय नाही.

त्यापेक्षा ४० % मधल्या काही टक्के खर्च करुन दुसऱ्यांकडुन ही कामं त्यांना करवुन घेवु द्यात.

"मच्छरदाणी वापरा , मच्छरदाणी वापरा "

आज उदासीन आणि बेपर्वा मुंबई महानगरपालिकेने सर्वांना फार मोलाचा सल्ला दिला आहे.

मुंबई आरोग्य अभियान, आपली मुंबई, निरोगी मुंबई अंतर्गत त्यांनी रामबाण उपाय सुचवला आहे, मलेरीयापासुन प्राण वाकवायला, "मच्छरदाणी वापरा , मच्छरदाणी वापरा "

राजाभाऊंपण आज म.न.पा ला एक फुकटचा सल्ला देवु इच्छितात.

"कारण मुळापासुन दुर करा, गलिच्छ, अस्वच्छ, मुंबई स्वच्छ करा, युद्धापातळीवर कामं हाती घेत ती स्वच्छ करा , त्यात लोकसहभाग मिळवा, लोकांपर्यंत ही मोहीम आपल्या अधिकाऱ्यांमार्फत घेवुन जा, त्यांचे मतपरीवर्तन करा. रहिवासी संघटना स्थापन करायला लावा, लोकांना पण रस्त्यावर आपण रहात असलेला विभाग स्वच्छ करण्यासाठी व तो तसाच साफ ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत करा, नुसत्या जाहिरातीनी, मोहीमांनी काय होते ? असंख्य वेळ्या त्या फसलेल्या आहेत. "

रिक्षाटॅक्सी मिटर जॅम आंदोलन.

आज राजाभाऊंनी प्रवाश्यांनी पुकारलेल्या "रिक्षाटॅक्सी मिटर जॅम " आंदोलनात आनंदाने भाग घेतला.

आतापर्यंत हे वहानचालक अडलेल्या, नाडलेल्यांना , सर्वांना आपल्या मर्जीनुसार , आपल्या तालावर नाचवत होते. आज गरीब बापुड्या, यांच्या मेहरबानींवर प्रवास करणाऱ्यांनी त्यांची मेहरबानी स्विकारण्यास चक्क नकार दिला.

केव्हातरी हे घडायला हवे होते.

यांच्या संघटना नेहमीच सर्वांना वेठीस धरत आलेल्या आहेत, प्रवाश्यांची कुठेतरी, कोणीतरी एकजुट करणे गरजेचे होते, त्याची सुरवात आज झाली.

आज कदाचीत मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचा या आंदोलनात सहभाग लाभला नसेल, पण झोपलेला सुस्त अजगराने डोळे जरासे का होईना पण किलकिले केले.

Tuesday, August 10, 2010

मागील पानावरुन पुढे

काय हो राजाभाऊ,

पुण्याला झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी देखील असाच काहीसा धुरळा उडाला होता ना हो आणि हो, हे बालेवाडीमधले सुसज्ज क्रिडांगण राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुन्हा वापरायचे सोडुन नव्याने कोट्यावधी रुपये खर्च करत परत हा दिल्लीमधला वायफळ खर्च कशाला ?

का आपली "वापरा आणि फेकुन द्या " का वापरा आणि कमवा नीती ?

Saturday, August 07, 2010

काय होणार ?

नुसत्या रुग्णालयाला भेटी देवुन काय होणार ? त्या वेळेपुरती ती रुग्णालयं चकचकीत केली जातात. 
केवळ परप्रातीयांच्या माथी दोष देवुन काय साध्य होणार ?

मुळ समस्या आहे तशीच राहीलेली. 
अस्वच्छ मुंबई, गलिच्छ मुंबई, स्वतःला ओरबडुन देणारी, स्वतःचा लचका तोडुन देणारी मुंबई, स्वःताला लुटु देणारी मुंबई.. 

हे शहर स्वच्छ, साफसुतरे करण्यासाठी गरज आहे ती लोकसहभागाची, लोकचळवळीची.  
गरज आहे ती नेत्यांच्या शब्दासाठी आपले प्राणपण देणाऱ्यां कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, आमदार यांनी रस्तावर उतरण्याची. 

स्वच्छतामोहीमी आखण्याची.

पण ....

आपले आपल्या शहरावर एवढे प्रेम असेल तर हे आदेश दिले जावेत, 

रस्तावर उतरा, विभागवार, रस्तावार , गल्लीवार रहिवाश्यांच्या सभा घ्या, युध्दपातळीवर प्रयत्न करुन मुंबई स्वच्छ करा.

मुळकारण समुळ नष्ट व्हावे. 

(केवळ मलेरीयाविरुद्ध युध्दाचे फलक लावुन काय होणार ? दक्षिण मुंबईत ज्या गल्लीमधे ही शिबीरे भरवली गेली, धुरफवारणी केली गेली, घरगल्यांमधे साठलेल्या सांडपाण्यावर किटकेनाशके फवारली गेली, त्याऐवजी त्या विभागातल्या घरगल्लांची सफाई केली गेली असती तर ? )


आणि हाच कदंब

आणि हाच कदंब शरदऋतुत -

हल्ली इंद्रधनु, मेघाबरोबरच नाहिसे झाले आहे.
सौदामिनीची गगनपताका फडकत नाही.
बगळे, आपल्या पंखांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यानें
आकाश घुसळून टाकीत नाहीत.
मयूर पण, माना उंच करून
नभाकडॆ पहात नाहीत.

नृत्य न करणाऱ्या मयूरांना सोडुन,
मदन
मधुर कुंजन करणाऱ्या हंसाजवळ जात आहे.
कदंब, कुटज, अर्जुन , सर्ज व नीप वृक्षांचा त्याग करून
पुष्पश्री
सप्तच्छदाजवळ जात आहे

ऋतुसंहार - कालीदास- अनुवादक - श्री, ज्ञानेश्वर कुलकर्णी

पुन्हा एकदा कदंब

हा कदंब परत एकदा भेटला तो "ऋतुसंहार’ मधे.

श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यामधे ते लिहीतात,

शुभ्र कमलांची आभा असलेल्या मेघांनी
ज्यांच्या पाषाणांना चुंबिले आहे
असे हे पर्वत,
सगळीकडॆ खळाळणाऱ्या जलौघांनी
व नर्तन करणाऱ्या मयूरांनी
गजबजुन गेल्यामुळे
विरही जनांना अस्वथ करीत आहेत.

कदंब, सर्जा, अर्जुन व केतकी
यांच्या फुलांनी सुगंधीत झालेला
व जलतुषारांनी भरलेल्या मेघांमुळे
शीतल झालेला
हा वायू,
कोणाचे बरं चित्त चाळवणार नाही ?

आज आपल्या केसातं गुंफताहेत अंगना
माला नवपुष्पांच्या,
बकुल फुलांच्या,
कदंबकळ्यांच्या, शुभ्र केतकींच्या.
आणि लावीत आहेत कानांवर
मनाप्रमाणॆ कर्णभुषणे ककुभकुसुमांची

नूतन जलधारांच्या वर्षावाने
उष्मा नाहिसा केलेला
हा वनप्रदेश
प्रमुदित झाला आहे
कदंबांच्या नवांकुरांनी;
नर्तन करीत आहे
वाऱ्यांनी हलणाअऱ्या शाखांनी;
हासत आहे केतकेच्या नवकोंबांनी.

मेघांचा समुदाय असलेला हा वर्षाकाल
वधूंच्या केसात माळत आहे
एखाद्या प्रियकराप्रमाणॆ.
जुईच्या कळा व उमललेली फुले,
आणि मालती-बकुल फुलांची माला,
कर्णभुषणॆ म्हणून लावीत आहे कानांवर
नवजात कदंबाची फुले.
श्री,ज्ञानेस्वर कुलकर्णी यांनी कालीदासाच्या "ऋतुसंहार" चे मराठीत छानसा अनुवाद केला आहे. त्यातले हे श्लोक.

Friday, August 06, 2010

अन्नासाठी काहीही करवीशी जगदीशा



रात्रीचे बारासाडॆबारा वाजलेतं. कचऱ्यामधे केवळा हा देह जगवण्यासाठी ह्या गृहस्थांना अन्न शोधावे लागतेयं.

हि अशी वेळ वैऱ्यावरही ना यावी.

नीपं दृष्टवा हरितकपिंश केसरैरर्ध्रुढै - आणि चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं, कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा

तर हा असा कदंब. 
कैकवेळा त्याला पाहिलेला. फुललेला, बहरलेला, स्वतःच्या तालात नादवलेला. 

लोकरंग मधे अपर्णा मोडकांचा लेख वाचल्यानंतर त्याची खुणगाठ पटली. 
मग तो कदंब भेटला शरदिनी डहाणुकर लिखीत "नक्षत्रवृक्ष " मधे. 
त्याचे सौदर्य मग खुलुन उठले ते मेघदुतात.   

मेघदुताचा  नीरा वैद्य, पद्मा कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी आणि मृदला गडनीस यांनी सुंदर भावानुवाद केलेयं. 

कदंबाबद्द्ल कालीदास लिहीतात ,

भुंगे कदम्बच्या अर्धस्फुट फुलातील हिरवट पिंगट केसर पाहुन, हरीण नदीकाठी पानथळीवरेल कर्दळीला प्रथमच आलेल्या कळ्या मोठ्या चवीने खावुन आणि हत्ती अरण्यातील तप्त भूमीतून येणाऱ्या मृदुगंधाचा घमघमाट हुंगुन तुझा मार्ग जाणतील.

आता तू पुढील मार्गावर लागलेल्या "नीचेः" नावाच्या पर्वतावर विश्रांती घे. पर्वतावरील कदम्ब वृक्षांची फुले तुझ्या पहिल्याच वर्षावाने एकदमच फुलतील. पर्वतभर फुललेली ही फुले तुझ्या स्पर्शाने पर्वतावर आलेल्या रोमांचाप्रमाणॆ दिसतील, या फुलांचा मदिरगंध पर्वतभर पसरलेला असतो, त्याचाच परिणाम म्हणून की काय या पर्वतावरील गुहांमधे वारांगना आणि विलासी नागरीक यांचा धुंद आणि उत्शॄखंल प्रणाय रंगतो. चोरट्या प्रणयाचा रतीपरिमल आसमंतात पसरलेला असतो. 

तुझ्या आगमानाने फुलणाऱ्या कदंबापुष्पांनी त्या आपला भांग सजवतात, कोमल , केसरमय , गोंडस शिरीषकुसुमांना श्रुंगारात कर्णाभुषणे स्थान असते. 

"सुश्लोकमेघ’  मधे रा.चिं.श्रीखंडे लिहीतात 

पुष्पे कदंबा हरिताभ पीत पाहोनि, ज्या केसरही न पूर्ण,
सरित्तटी ओलिंत कंदलीना आल्या कळ्या त्या पहिल्या गिळून,
वनांतरीच्या क्षितिच्या सुगंधां आस्वादुनी त्वत्पथ ये कळोनी - 
भृंगा, कुरुंगा, वनिच्या मतंगा परोक्ष गेलासि गळोनी  !

विश्रांतीसाठी वस तेथ मित्रा ! नीचैः प्रथा ज्या गिरीलागि होत
त्वन्मीलनें फुल्लकदंबरुपे तो प्रेमरोमांचितस्त्राचि मूर्त !
वारांगनांच्या रतिगंधयोगे ज्याच्या गुहा उत्कट दर्शवती
की यौवने तेथील नागरांची उद्दामता केवढि ती धरती !

लीलांबुजे , जेथ, कर स्त्रियांच्या, केशात कुंदे माळलेली
पराग लोध्रांतरिंचे पडोनी त्यांची मुखश्री धवलत्व ल्याली.
कोरंटिही भूषवि केशपाशां, कर्णांवरी शोभतेसे शिरीष
तैशी तुज्या आगमिचीं कदंबे भांगात त्यांच्या सजती विशेष !

याच कदंबाबद्द्ल द.वि.पंडीत यांनी जो मेघदुताचा अनुवाद केला आहे त्यात ते लिहीतात,

खाई कंद प्रथम फुलले गंध घेई धरेचा
कादंबाचा बहर लुटतो वर्षबिंदु घनाचा
पुण्यांशाचा तव सुचीविला मार्ग तद्विक्रमांनी
सारंगानी मृगगजालीचातकादि क्रमांनी ॥

नीचैश्शेल श्रमहर तिथे थांब विश्रांतिसाठी
त्वत्संयोगे गंहिवर तया नीप-पुष्पेच मोठी
वारस्त्रीच्या रतिपरिमळे धुंदशा गव्हरी तो
उतूं हाते तरुणपण तें गांवचे दाखवीतो ॥

ताजीं पद्में मिरविती करी लाविती कुंदवेणी
घेती लोध्रोद्ववरजवळे गौरता गौरवोनी
वेण्यांमधे कुरबक नवे कर्णभागी शिरीष
त्वकादंबे सजविति वधू रम्य सीमन्तदेश ॥

Sunday, August 01, 2010

बंद आणि गॅल्पस आणि विनय हेल्थ होम

तर हा बंदचा प्रकार राजाभाऊंना फार भावला.
पुढचा शनिवार. मुंबईमधे मुसळधार पाऊस नुसता कोसळुन राहिलेला, त्यात राजाभाऊ मुलासाठी लॅपटॉप घेण्यासाठी सकाळीच सहकुटुंब, सहपरिवार बाहेर पडलेले.
या पावसाळी बढीया माहोल मधे कुठे जेवायला जायचे , अश्या ठिकाणी की जिथे बसुन पाऊसाची मस्तपैकी मजा लुटु शकु, ज्या जागी बसल्याबसल्या बाहे रपारप बरसणारा पाऊस, सर्वत्र छायी हुवी हरीयाली,  ज्याच्या व बाजुची घराच्या दगडी भिंती साऱ्या साऱ्या वेलीने आच्छादलेल्या, जेथे जेवण अत्यंत चविष्ट मिळाते , छानसे बंगलेवजा रेस्टॉरंट असावे. तर राजाभाऊंना एक नाव त्वरीत आठवले, अशी ही जागा जी त्यांची फेव्हरेट होती. 

मुंबई रेसकोर्स मधे "गॅल्पस" नामक एक रेस्टारंट आहे जेथे मोघलाई व कॉंटीनेंटल पदार्थ पार चवदार मिळतात, असे एक ठिकाण ज्याच्या आतबाहेर सगळीकडॆ घोडे , घोड्याच्या शर्यतीने भारलेले.

बाहेरील कोसळणारा पाऊस पहात , मैदानात वाढलेल्या हिरव्यागार गवताने मनाला तोशीवले, शरीराची भुक ती तर गॅल्पस मधल्या जेवणाने भागवलेली.

रात्र झाली. राजाभाऊंच्या मुलाचे परत फर्माईश चॅनल सुरु झाले, तिखट, चटकदार, गरमागरम मिसळपाव खायला जाण्याची त्याची इच्छा मग त्याच्या बापाने त्यांना फणसवाडीच्या नाक्यावर असलेल्या "विनय हेल्थ होम’ मधे नेवुन पुरवली. त्यांछ्या साठी पातळभाजी पाव, त्यांच्या बायकोने मागवला साबुदाणा वडा , जो ती केवळ त्या सोबत मिळणाऱ्या चटणीसाठी , जिच्यासाठी ती जीव टाकते, व मुलाने दहीमिसळ मागवली.


बंद आणि सयाजी, गोडवा, जगात भारी कोल्हापुरी आणि उमीया कच्ची दाबेली

बंद म्हणजे साफ बंद. राजाभाऊंच्या बायकोनी त्यांना निक्षुन सांगितले.

राजाभाऊंनी मनाशी विचार केला, बंद काय फक्त विरोधी पक्षांनीच पाळायचा असतो ? कधी तरी (की नेहमीच ) एखाद्या दिवशी सत्ताधारी स्वामिनीने पाळला तर काय बिघडले.

पण हा लाक्षणीय बंद जेव्हा दोन दिवस पाळायचे ठरवले ना तेव्हा मात्र जरा काळजी वाटायला लागली, कसे काय आता निभवणार ? दोन दिवस स्वयपाकघर बंद म्हणजे जरा अतीच.

दिवस पहिला.

बंदची सुरवात भरल्यागच्च पोटांनी, थाटात व्हायला पाहिजे करुन मग ते वाकडला नव्याने आलेल्या सयाजी मधे बुफे जेवायला गेले.  पुण्यामधे चांगल्या बुफे जेवणासाठी सयाजीचा क्रमांक फार वरती लागायला हरकत नाही. फार अगत्यशील कर्मचारीवृंद, छानशी जागा, आणि चविष्ट , नाना प्रकार असलेले जेवण, स्टार्टस, सॅल्डस, कॉन्टेनेंटल पदार्थ, बिर्यानी पासुन सर्वकाही आणि हो भरपुर वेगवेगळ्या प्रकारची डॆसट्‌र्स ( राजाभाऊ फक्त डेसर्टसच खायला जातात हे त्यांच्या आकारमानावरुन नक्की कळुन येते ), हे सारे अवघे रु. ३७५ मधे आनि वर परत कॉरपोरेटसमधे काम करणाऱ्यांसाठी १० % सवलत. मजा आली.

रात्री मात्र बाहेर पडायचा कंटाळा आला, मग ते रहात असलेल्या गृहसंकुलातील "गोडवा" मधे वाग्यांचे भरीत व भाकरी खायला गेले.


दिवस दुसरा.

स्थळ ’जगात भारी कोल्हापुरी " मधे अख्खा मसुर ची,  कोल्हापुरची एक फाकडी भाजी खायला, सातारा रोडवर, सीटी प्राईड समोर गेले, सोबत ही भली मोठी रोटी, भरपुर मस्का मारलेली.

अख्ख्या मसुराची भाजी आणण्याआधी त्यांच्या समोर एका छोटाश्या वाटीत  चव घायला म्हणुन , किती तिखट भाजी हवी हे जाणुन घेण्यासाठी थोडीसी भाजी आणुन दिली गेली.

रोटीचा आकार बघुन दडपलेल्या जीवास शांत करण्यासाठी मग "खुस्का राईस " हादाडला गेला.

आता तरी बंद मागे घे या विनंतीला पहिला मोडता घातला गेला तो त्यांच्या सुपुत्रा कडुन, त्याला म्हणॆ नवसह्याद्री मधे "उमीया कच्छी दाबेली " मधे दाबेली खायला जाण्याची इच्छा झालेली.

वारजेल्या रहाणाऱ्या एक बाई, येथे नवसह्याद्रीमधे जे गणेश भेळीचे दुकान आहे त्याच्या कोपरय़ावरुन जरापुढे वळले की डाव्या हाताला, चितळे बंधुंच्या जरा पुढे दाबेलीचा स्टॉल लावतात. फार चांगली येथे कच्छी दाबेली मिळते.

बंद यशस्वीरित्या पार पडला. सर्व जणांचे त्याला चांगले सहकार्य मिळाले.


शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???  
पडक्या मशिदीमधे फाटक्या चिंध्याने बांधलेले फळकुटावर झोपणारे , अत्यंत साधी रहाणी असणारे साईबाबा आणि आता कथाकथीत भक्तांनी त्यांना सोन्याने मढवुन टाकलेले  त्यांचे रुप.

बसायला सोन्याचे सिंहासन, सोन्यानी मढवलेला महाल, सोन्याची छत्रचामरे, सोन्याच्या पादुका, वेळ बघायला सोन्याचे ११ लाखाचे घड्याळ, सोन्याच्या पादुका आणि फिरायला सोन्याची पालखी.


तरी नशीब चांगले अजुन तरी साईबाबांची संपुर्ण सोन्याची मुर्ती करण्याचे कोण्या धनवान भक्ताच्या मनात आलेले नाही.

एक जमाना असा होता, शिर्डी एक खेडेगाव होते, अगदी तुरळक भावीक मंडळी यायची आणि त्यांची रहाण्याची सोय चक्क समाधी मंदिरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांमधे केली जायची. 

आणि मग हळु हळु देवस्थानाचे रुपांतर संस्थानात, एका साम्राज्यात होत गेले. 

मलेरीयाग्रस्त मुंबई

मलेरीयाग्रस्त मुंबई आणि मी पाच हजारकोटी रुपयाचा गैरव्यवहार केला तर तु ६ हजार कोटींचा ह्याचे भुषण वाटणारे नेते- 





श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र

घीर घीर के आसमां पर छाने लगी घटायें
कह  दो कोई पियासे घुमने जाये.

मनमुराद वर्षावर्षाव झेलण्यासाठी, हिरवाईने नटलेल्या सृष्टीचे डोळ्याचे पारणॆ फेडणारे वैभव न्याहाळायला जाण्यासाठी , झऱ्याचे पाणी पित आपली तृष्णा शमावण्यासाठी राजाभाऊ जेवढे आतुर झाले होते तेवढीच ती अनात्सुक. ते म.रा.प.म. च्या बसनी प्रवास करणॆ, ती पायपीट तिला नकोशी झालेली.

मग राजाभाऊंनी एक अप्रतिम स्थळ शोधुन काढले, पुण्याजवळील पौड-कोळवण्याच्या पुढे हडशी गावात असलेले " श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र ". एक निसर्ग्यरम्य लावण्यमयी जागा.

चांदणी चौकात १५-२० माणसे कोंबंकोंबलेल्या जीपातुन आता कसा प्रवास करायचा ह्या विचारात पोटात आलेला गोळा. तेवढ्यात समोरुन कोळवणची आलेली बस.

मस्तपैकी पावसाने ताल धरलेला, सारे सारे कसे भारलेले , जेथवर लक्ष जाईल तेथ पर्यंत फक्त हिरवा आणि हिरवा रंग, नाना छटा घेवुन राहिलेला, आल्हाददायक वातावरण, डोंगरमाथ्यावर धडका देत , तो व्यापुन झाकुन टाकलेले मेघ, अवखळ झरे, आणि हाडह्सी गावातुन क्षेत्राकडॆ जाणारा छानसा छोटासा नीटनेटका छानसा घाट, दुतर्फा लावलेले कल्पतरु आणि आमराई, तो तिथला खालच्या अंगाला दिसणारा तलाव, तो धबधबा , बस्स और क्या चाहिये जीने के लिये.

हिरवी, ओली , गार हवा , मोकळ्या हवेतील प्राणवायु
 नाही नाही हे सारे पेलवत, मुंबईमधे रहाणाऱ्या माणसाला.


यहीं बहार है यही बहार है दुनीया को भुल जाने की, खुशी मनानेनी

ये प्यारे प्यारे नजारे ये थंडी थंडी हवा, ये हल्का हल्का नशा
निकलगे आ गयी रुत मस्तीया लुटानेकी, खुषी मनानेकी.

वर पोचलो सारे दृश्य पालटले, नीटनेटका मंदिराचा परिसर, सुरेख देवालय, सभोवतालचे गवतांनी आच्छादलेले गवती कुरण, त्यात बसण्यासाठी केलेल्या घुमटी.

मन प्रसन्न झाले.

आणि प्रसन्न झालेले मन आणखीन खुष झाले ती समोर आलेली गरमागरम कांदा भजी आणि वाफाळलेली कॉफीचा स्वाद घेतांना. बाहेर रपारपा पडणारा पाऊस, गरमागरम कांदा भजी आणि सोबत ती. तिचा हवाहवासा वाटणारा सहवास.  ( लग्नानंतरच्या इतक्या वर्षाने देखील ??? )


पायी पायी खाली उतरतांना तर !!





इंद्रदेवते



हे इंद्रदेवते
तु आपल्या वज्राने
मेघांवर प्रहार कर.

हे इंद्रदेवते
पर्जन्याने सुखावलेली धरती
आम्हास भरभरुन अन्नधान्य देवो

Saturday, July 31, 2010

प्रौढपुष्पेः कदम्बै:

रुक रुक के चली और चलके रुकी.
लोकल ट्रेनची अवस्था वाईट होती. पण राजाभाऊंना त्याच काय ? त्यांच मन विहरत होते नॉर्वे मधे, जणु ते नॉर्वेमधल्या "बर्गन रेल"नेच प्रवास करत होते , मेधा आलकरी लिखीत ’सुर्य होता रात्रीला " हे प्रवासवर्णन वाचता वाचता.

अपर्णा मोडक यांनी लोकसत्ता मधे लिहिलेला कदंबा वरील अप्रतिम लेख वाचल्यानंतर केव्हा एकदा हा वृक्ष, ती मोहक फुले पहातो असे झाले होते.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84563%3A2010-07-09-06-59-22&catid=104%3A2009-08-05-07-53-42&Itemid=117

आणि अचानक राजाभाऊंचे तिच्याकडे लक्ष गेले, अगदी त्यांच्या समोर , ती तिथेच बाहेर होती, लावण्यवती, भुलवणारी , मोहावणारी. जिला त्यांना आधी असंख्य वेळा पाहीले असेल पण नाव ठावुक नसलेली ती अनामिका,
ती कदंबाची वेडावुन सोडणारी फुले. 
सा सुदरा अस्ति ।


आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।


आषाढ आला, मेघदुताचे वेध लागले.

तर मग असा हा कदंब राजाभाऊंना मेघदुतात पण भेटला.

नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पेः कदम्बै: ॥

रोमांचित होती तव स्पर्शे कदंबाचीहि फुले
नीचगिरी आहे विश्रांतीला तू थांब जरासा रे ॥

हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्ध
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामाननेश्रीः ॥

चुडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम ॥

आहे जिथे वधूच्या केसात कुन्द माळलेले,
विलसते तेज मुखांवर लोध्रपुष्पे परागे ॥
केशपाशी नव-कुरबक, कदंब-पुष्प भांगी
असे कानीं मोहक शिरीष, क्रीडा-कमळ हाती ॥


नीपं दॄष्टवा हरितकपिशं केसरैरर्धरुढे
राविर्भुतप्रथमुकुलाः कन्दलीश्चनुकम ॥
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाध्रय चोर्व्याः
सारड.गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम ॥


अर्धकेशी हिरवी करडी नीवफुले पाहत
पाणातिरी नवमुकुलांछ्या कंदली खात खात ॥
दग्धवनी हुंगत असता मधु मातीचा गंद
नवजल शिंपीतां तुजला दावि मार्ग सारंग ॥

ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या " हे मेघा " मधुन मराठी, आग्लभाषीय काव्यानुभाव साभार.

There you should stay
with the object of taking rest
On the mountain of Nicha
Bristling as it were , at your touch,
With Kadamba trees,Promient with flowers.


Where the young ladies have
A sportive lotus in their hands
Interweave their hair
With fresh Kunda flowers.
Have a beauty of face
Renered yellowish white
With pollen of Lodhra flowers
Wear the fresh Kurabaka flowers,
in their luxuriant hair,
The lovely Sirisa on their ears,
And the neepa that spring up
Into existance at your approach
On the line of parting of their hair

Seeing the neep flowers
Greenish brown
On account of half-grown filaments,
Eqating the leaves of KAndalis
On marshy banks
With the first buds appearing on them,
And shelling the strong odour
Of ground in forests
- the bees , - the deers, the elephats
respectively
Will indicate the path to you,
Showering droups of water.

आज अचानक

रुक रुक के चली और चलके रुकी.
लोकल ट्रेनची अवस्था वाईट होती. पण राजाभाऊंना त्याच काय ? त्यांच मन विहरत होते नॉर्वे मधे, जणु ते नॉर्वेमधल्या "बर्गन रेल"नेच प्रवास करत होते , मेधा आलकरी लिखीत ’सुर्य होता रात्रीला " हे प्रवासवर्णन वाचता वाचता.
अपर्णा मोडक यांनी लोकसत्ता मधे लिहिलेला कदंबा वरील अप्रतिम लेख वाचल्यानंतर केव्हा एकदा हा वृक्ष, ती मोहक फुले पहातो असे झाले होते.
आणि मग अचानक राजाभाऊंचे तिच्याकडे लक्ष गेले, अगदी त्यांच्या समोर , ती तिथेच बाहेर होती, लावण्यवती, भुलवणारी , मोहावणारी. जिला त्यांना आधी असंख्य वेळा पाहीले असेल पण नाव ठावुक नसलेली ती अनामिका, ती कदंबाची वेडावुन सोडणारी फुले.
सा सुदरा अस्ति ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।
आषाढ आला, मेघदुताचे वेध लागले.
तर मग असा हा कदंब राजाभाऊंना मेघदुतात पण भेटला.
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पेः कदम्बै ॥
रोमांचित होती तव स्पर्शे कदंबाचीहि फुले
नीचगिरी आहे विश्रांतीला तू थांब जरासा रे ॥
हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्ध
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामाननेश्रीः ॥
चुडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम ॥
आहे जिथे वधूच्या केसात कुन्द माळलेले,
विलसते तेज मुखांवर लोध्रपुष्पे परागे ॥
केशपाशी नव-कुरबक, कदंब-पुष्प भांगी
असे कानीं मोहक शिरीष, क्रीडा-कमळ हाती ॥
२१,२५ २६
नीपं दॄष्टवा हरितकपिषं केसरैरर्धरुढे
राविर्भुतप्रथमुकुलाः कन्दलीश्चनुकम ॥
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाध्रय चोर्व्याः
सारड.गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम ॥
अर्धकेशी हिरवी करडी नीवफुले पाहत
पाणातिरी नवमुकुलांछ्या कंदली खात खात ॥
दग्धवनी हुंगत असता मधु मातीचा गंद
नवजल शिंपीतां तुजला दावि मार्ग सारंग ॥
ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या " हे मेघा " मधुन मराठी, आग्लभाषीय काव्यानुभाब साभार.

Monday, July 26, 2010

काय हो हरेकृष्णाजी

महिना दोन महिना पुर्वी राजाभाऊ ब्लॉगर्सच्या स्नेहभोजनाला म्हणुन जे गेले ते कुठे गायब झाले आहेत ?
kaaya

Saturday, July 03, 2010

ब्लॉगर्सचे स्नेहभोजन

आज योग अखेरीस आला, गेले कित्येक महिने एकत्र जमायचे , एकत्र भेटुन मनमुराद गप्पा हाणायच्या (पहिल्या वेळेच्या भेटीत आता दर महिन्यातुन एकदा जमायचे असा ठराव मंजुर झाला होता पण ... ),  याचा बेत ठरत होता.  पण यंदाला मात्र जरासा घोळ झाला,  कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते,

लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले.   तारीख तर पक्की झाली होती,  ३ जुलै. पण कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते, लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले.   

अखेर "सुरंगा" ( http://kaimhanta.blogspot.com )यांनी पुढाकार घेत अंधेरीस कोहीनुर कॉंटीनेंटल मधे जाणे पक्के करुन टाकले.

मग काय.

गप्पा, गप्पा आणि गप्पा.  मग त्या पुढे जेवणाचे ते काय, ते आपले निमित्त पात्र.


http://vivek-uvaach.blogspot.com/

http://whynotblogitout.blogspot.com/

http://kavismusings.blogspot.com/

http://kaimhanta.blogspot.com/

अपुर्ण.

बंद बंद आणि बंद

मग काय राजाभाऊ, सोमवारी काय बेत ?

महागाईविरुद्धच्या लढ्यात भागबिग घेणार आहेत की नाही ?

Thursday, July 01, 2010

मेघ मल्हार -दिवस तिसरा - पं.कालीनाथ मिश्राजी

हा पाऊस कुठे गायब झाला आहे ?

तापलेले शरीर थंड तर केलेच  नाही परत वरती या शरीराला "ताप" देवुन ह्या फसव्या पावसांनी राजाभाऊंना दोन दिवस नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " पासुन दुर ठेवले. राहुल देशपांडॆ ऐकायचे राहुन गेले, मंजिरी असनारे केळकर, त्यांचे गाणे परत ऐकण्यासाठी केलेली दिर्घ प्रतिक्षा वाया गेली, या पावसाने, या पावसाने घात केला. 

शेवटच्या दिवशी थोडॆ तरी काहीतरी ऐकावे म्हणुन राजाभाऊ पं.कालीनाथ् मिश्रा यांचे तबलावादन ऐकण्यासाठी कसेबसे पोचले.

आपल्या चवदा शिष्यांसमावेत तबलावादन करण्याऱ्या कालीनाथजींचे हे नवे रुप काल पहायला मिळाले, आता पर्यंत त्यांना पाहिले होते ते केवळ कथ्थकला साथ करतांना.

तबल्यावर अनेक रुपात बरसात बरसत होती, कधी मंद मंद, बुंद बुद तर कधी मुसळधार वर्षा, आणि काले बादल, अनावर झालेले, मस्तवाल टकरा घेणारे, पाण्याने भरलेले बादल, ती कडाडणारी बिजली, धरतीची वेध घेवु पहाणारी ती तेजस्वी सौदामीनी.

तालासुरात, मेघ वर्षावात सर्व जण भिजुन निघत होते, त्यात भर पडली ती काही नर्तकांनी तबलावादनात सादर केलेल्या कथ्थक नृत्याने. 

कैसे जीये कोई बिरहकी मारी

हजारो मैलाचा प्रवास करत संदेशवहानाचे काम करणारं कबुतर.  पण हिला साधा बाहेर जाण्याचा भलामोठा रस्ता सापडुन नये ?   कित्येक तास, भेदारलेल्या अवस्थेत, आहे त्याच जागी, बाहेर पडण्याच्या अनेक प्रयत्नानंतर देखिल.


आणि तिचा जोडीदार, काय करत होतो तो इतके तास ? 

बाहेरच्या बाजुस बसुन तिला धीर देत होता. "मै हुं ना "



मिलनाची घडी अखेरीस आली.

ब्लॉग म्हणजे

ब्लॉग म्हणजे साखळदंड.