Thursday, July 01, 2010

मेघ मल्हार -दिवस तिसरा - पं.कालीनाथ मिश्राजी

हा पाऊस कुठे गायब झाला आहे ?

तापलेले शरीर थंड तर केलेच  नाही परत वरती या शरीराला "ताप" देवुन ह्या फसव्या पावसांनी राजाभाऊंना दोन दिवस नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " पासुन दुर ठेवले. राहुल देशपांडॆ ऐकायचे राहुन गेले, मंजिरी असनारे केळकर, त्यांचे गाणे परत ऐकण्यासाठी केलेली दिर्घ प्रतिक्षा वाया गेली, या पावसाने, या पावसाने घात केला. 

शेवटच्या दिवशी थोडॆ तरी काहीतरी ऐकावे म्हणुन राजाभाऊ पं.कालीनाथ् मिश्रा यांचे तबलावादन ऐकण्यासाठी कसेबसे पोचले.

आपल्या चवदा शिष्यांसमावेत तबलावादन करण्याऱ्या कालीनाथजींचे हे नवे रुप काल पहायला मिळाले, आता पर्यंत त्यांना पाहिले होते ते केवळ कथ्थकला साथ करतांना.

तबल्यावर अनेक रुपात बरसात बरसत होती, कधी मंद मंद, बुंद बुद तर कधी मुसळधार वर्षा, आणि काले बादल, अनावर झालेले, मस्तवाल टकरा घेणारे, पाण्याने भरलेले बादल, ती कडाडणारी बिजली, धरतीची वेध घेवु पहाणारी ती तेजस्वी सौदामीनी.

तालासुरात, मेघ वर्षावात सर्व जण भिजुन निघत होते, त्यात भर पडली ती काही नर्तकांनी तबलावादनात सादर केलेल्या कथ्थक नृत्याने. 

No comments: