Friday, April 01, 2011

शिव्या दिल्यांने कधी कोणाचे "कल्याण" झाले आहे काय.

"साल्या." 

राजेशभाईंनी आपल्या मुलाला भुकेल्या आणि कळमळलेल्या पोटी सणसणीत शिव्या काय हासडल्या आणि त्या मुलाने आपल्या बापाचे "कल्याण" काय केले.

बायको. खरेदी, महाखरेदी , प्रचंड खरेदी आणि मुलाचा गिटारचा वर्ग.

संध्याकाळचे साडेचार वाजलेले. उपाशी पोट. मुलालाही भुक लागलेली असेल करत त्याच्यासाठी थांबलेले सर्व.

तरी बरं नगर रस्तावरील "स्पेन्सर्स " मधल्या मस्त बेकरीत च्यावु म्यावु तोंडात टाकुन झाले होते.



काहीच सुचत नसल्यामुळे राजेशभाईंनी हडपसर वरुन लोणीकाळाभोरच्या दिशेकडे गाडी सोडली संस्कृतीत जावुया करुन आणि मग धीर धरणे मुस्श्कील  झाल्यामुळे गाडी माघारी काय वळवली. 

"अगं , मगरपट्टात काहीतरी खावुया "
"नको"
"का नको "
"नको"
"हे बघ कुठे जायचे ते आत्ता ठरवा, त्या दिशेने मी गाडी नेतो"

कॅंम्पपासुन डेक्कन पर्यंत गाडीत बसल्याबसल्या फिर फिर फिरवणॆ झाले. मधेच या त्राग्यात एन आय बी एम रस्तावरील एक उपहारगृह पुढे गेल्यानंतर लक्षात आले.

वरती मुलाने शिकवलेले शहाणपण.
"काय भुक भुक चालवलं आहेस "

मग काय. 
बायको , मुलगा आणि C.F.O. (चीफ फायरींग ऑफीसर)

"चल सरंळ चल सांगितलं ना"
शेवटी दया आल्यामुळे मुलाने राजेशभाईंना गाडी बिबवेवाडीच्या रस्तावर असलेल्या "कल्याण  भेळ " कडॆ घ्यायला लावली.

मग काय. हाण गणप्या हाण.

मटकी भेळ,भेळ, रगडा पॅटीस, थोडीशी शेव बटाटा दही पुरी, डोश्याचा एखादा तुकडा, आणि शेवटी दहीवडा. छानश्या दह्यातला.







हे "कल्याण भेळ" उत्तम ठिकाण आहे,दर्जेदार खाद्यपदार्थ मिळण्याचे.

No comments: