Tuesday, April 26, 2011

चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय

अनेक वर्षे मनाशी धरलेली इच्छा अखेर पुरी झाली.  चंद्रकांत यांनी काढलेली चित्रे पहाण्यासाठी मन आसुसलेले. मधे केव्हातरी नेहरु सेंटर मधे कला प्रदर्शनात त्यांची काही चित्रे पाहिलेली. पण त्यांच्या वास्तुत जावुन ती पहायची होती.

कोल्हापुरला जाण्याचे हे एक मुख्य कारण.

बाबा गजबर, चंद्रकांत, सुर्यकांत हे सारे राजाभाऊंच्या काकांचे जिव्हाळ्याचे विषय. ते या साऱ्या कलांवतांबद्द्ल ओढीने सांगायचे तेव्हा तेव्हा राजाभाऊ त्यांची थट्टा करत आलेले.

पण आता त्यांची यापुढे मस्करी नाही करणार.

No comments: