Tuesday, April 05, 2011

बहुत ही भारी पडा रे विश्वचषक

"काय गरज होती एवढ्या लांब जाण्याची ? खाली सर्व पुजेचे सामान मिळाते "
इती गुरुजी.
त्यांना कोठे ठावुक होते राजाभाऊंच्या मनात काय आहे.

आपला नवरा केवळ आपल्यासाठी पुजा करायला तयार झाला , एवढेच नव्हे तर खुद्द पुजेस बसण्यास राजीखुषीने तयार झाला म्हणुन राजाभाऊंची बायको काय खुष झाली.
पण तिला कुठे ठावुक होते  आनंदाच्या शिखरावरुन ती एका झटक्यात खाली उतरु शकते.

काळे किंवा मतेंकडॆ पुजेच्या सामानाची खरेदी, मग जोश्यांकडे मिसळ, मंडईजवळ उभा असलेल्या गाड्यांवरील फणसाच्या गऱ्यांवर ताव मारणॆ, उत्साहाच्या वातावरणाचे फोटो काढणे आणि मग चितळ्यांकडॆ श्रीखंड , आलेपाक वगैरे वगैरे.

सरळ साधा, सोपा बेत, जो गुरुजींना ठावुक नव्हता व  नियतीला तो मान्य नव्हता.

आपला नवरा भडकुन आज आपल्याला शिव्या दे दे देइल , त्याच्या सहनशक्तीच्या मर्यांदा ओलांडल्या नंतर तो जो काही विचित्र वागेल व त्यामुळॆ घडलय बिघडलयं होवुन जाईल हे तिला कुठे ठावुक होतं ?

तुळ्शीबाग, मंडई परीसर् , अणि लक्ष्मी रस्ता.  समस्त पुणेकर आदल्या दिवशी गुढीपाडव्यासाठी खरेदीला रस्तावर उतरतील हे काही राजाभाऊंच्या भेज्यात आले नव्हते.

ट्रॅफिक जॅम. जॅम म्हणजे जॅम. माणसांचा अथांग महासागर, सारे पुणॆ येथे लोटलेले. उभा गाड्या, आडव्या गाड्या , समोर गाड्या, मागे गाड्या, एक मोटरसायल, दहा मोटर सायकल ,शंभर स्कुटर, पाचशे स्कुटर. 

बायकोला खरेदी साठी उतरवलेले. आलोच आता गाडी लावुन करुन पुढे निघालेले राजाभाऊ. 
इंच इंच जागा लढवत. इथे गाडी उभी करत, पुढे घेत, मागे सरकवत, ह्या जागेवरुन त्या जागेवर गाडी नाचवत जे राजाभाऊंचे टाळके सटकले , बास रे बास.

त्यात शेवटची काडी . झेंडुच्या फुलांची खरेदी आणि  त्यातुनही समाधान न झाल्यामुळे "आलेचं " करत गायब होणे.

आय माय.

ह्या सर्वाला कारणीभुत तो विश्वचषक.

आद्ल्या दिवशी नशेत गाडीवर ग़ाडी आदळुन घेतलेले. विजयाचा कैफ, नशा, खेळणारे खेळले, कमवणारे कमवुन गेले.

गाडी ठिक करण्याच्या नादात सारे वेळेचे गणित कोलमडुन पडले.
मग असे बिच्च्यारीला धाडकन शिखरावरुन खाली यायला लागले   

No comments: