Monday, April 25, 2011

"द कॅसल " मधे जेवण. ज्याचा शेवट "जगात भारी "

कोल्हापुरात मनपसंद शाकाहरी भोजन न मिळाल्यामुळे राजाभाऊ तसे नाराजच झाले होते, त्यात राजाराम कॉलेज जवळचा श्याम यांचा भलामोठाला बटाटावडा व राजाभाऊंची भेळ खायला न मिळाल्यामुळे त्यांचे मन खट्टुच झाले होते. कोल्हापुर बद्दल आता मनात अढी घेवुन परतावे लागते की काय असे वाटत असतांना अचानक त्यांना अन्नलाभ झाला.

राजारामपुरी, दुसरी गल्ली , "द कॅसल " . राजाभाऊंना या ठिकाणी जेवणासाठी आमंत्रण मिळाले. आता काय आणखीन वेगळे असणार म्हणता म्हणता त्यांना अचानक सुखद धक्का बसला. आत प्रवेश करता तबीयत खुष झाली. छोटेखानी जागा, पण जेवण मात्र अती चविष्ट. 

काजु आणि मक्याच्या मागवलेला भाजीचा बेस पालकचा पाहुन वाटले होते आता कसं व्हायचं, पण जराशी ती भाजी चाखुन पाहिली आणि मग खातच रहा, खातच रहा. त्यात नंतर समोर आली ती व्हे. बिर्याणी. जशी हवी अगदी अगदी तशीच.


कोल्हापुरात परत जाण्यासाठी एक कारण सापडले.

No comments: