Monday, April 18, 2011

ચાલો જમવાં જાલાવાડીમાં

ભોજનકક્ષ. જાલાવાડી..

श्रीखंडाचा खासा बेत , गरमागरम फुलके, कॉन पॅटीस, कॉनकॅप्सीकम, चण्याची भाजी, पापड, फेण्या, डाल चावल. प्योर जैन भोजन.  त्यात महावीर जयंती.
मग काय. राजाभाऊ तुटुन पडले जेवणावर. आणि मग जेवल्यावर अशी सुस्ती आली म्हणायची की प्रतापगडला जाण्याचा पण कंटाळा आला.

पण काय करणार, त्यांना प्रतापगडला जाण्यावाचुन दुसरा पर्याय होता काय ?

राजाभाऊंच्या वडिलांनी राजाभाऊंना फर्मावले. "मला प्रतापगडला जायचयं "

राजाभाऊ चक्रावले  ? आत्ता या वयात ? ज्या पिताश्रींनी जन्मभर आपल्या गिर्यारोहणाच्या छंदावर तुफान टीका केली, त्यांना चक्क किल्ला चढावासा वाटतो ?

राजाभाऊंनी कानाडोळा केला, या कानाने ऐकुन त्या कानाने सोडुन दिले.

पण शेवटी राजाभाऊंना त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले. कारणच तसे जबरदस्त.

" अरे आम्ही हनीमुनला आलो होतो तेव्हा प्रतापगडला गेलो होतो.  आई भवानीला बोललो , आमच्या लग्नाला पंन्नास वर्षे होईस्तो जर आम्ही जिवंत असु तर परत तुझ्या दर्शनला येवु.

यावर राजाभाऊंना काही बोलता येईना.


मग ते निघाले त्या दिशेने. त्यांनी त्यासाठी पाचगणीत "कृष्ण व्हिला" मधे मुक्काम ठोकला. पाचगणीमधे शांतपणे निसर्गात रहायचं असेल तर हा बंगला चांगला आहे.  प्रशस्त जुन्या जमानातील बंगला, पंचतारांकीत सुखसोई हव्या असणाऱ्यांसाठी बिनकामाचा. येथली माणसे फार अगत्यशील आहेत.राजाभाऊंचे पाचगणीमधील रहाण्याचे व जेवणाचे ठिकाण एकदम ठरलेले.  "कृष्ण व्हिला " रहाण्यासाठी. सकाळी जैन  पद्धतीचे जेवण  जालावाडी सॅनीटोरीयम मधे आणि मग गुजराती पद्धतीचे जेवण कृष्ण व्हिला मधे.

देवदर्शनाला म्हणुन  राजाभाऊ आणि त्यांचा समस्त परिवार गेला करा, पण त्यांना कळस दर्शनावर समाधान मानावं लागले, १०० किलोचा त्यांच्या देह हल्ली त्यांच्याने पेलवेनासा झाला आहे.

परततांना त्यांचा विचार होता की पांचगाणीतुन कुडाळ - मेढा मार्गे किंवा भिलार - मेढामार्गे साताऱ्याला जायचे. पण मग म्हाताऱ्यां माणसांना घेवुन वाकडी वाट धरु नये असा त्यांनी विचार केला आणि मग ते सरळ वाई- पाचवड मार्गे साताऱ्याला पोचले.





No comments: