अजुन पर्यंत काही कोल्हापुरचा फील येत नाही असा विचार करुन राहिलेल्या राजाभाऊंनी तडक वाट पकडली ती मोतीबाग तालिमीची. आपण ही एकदोन डाव टाकु असा विचार करणारे राजाभाऊंनी प्रत्यक्ष वेळ आल्यावर माघार घेणे जास्त पसंद केले.
कोल्हापुरात राजाभाऊंना कोणती गोष्टे भावली असेल तर तेथल्या माणसांचा प्रेमळ, मनमिळावु, मदतीला सदैव तयार असलेला स्वभाव. खुप चांगल्या स्वभावाची माणसं त्यांना भेटली.
श्री. मुकंदराव सिताराम करजगार यांनी अगदी आपुलकीने राजाभाऊंना तालीमीची सारी माहिती दिली. बऱ्याच पहेलवानांनी राजाभाऊंना त्यांचे फोटो काढुन दिले.
No comments:
Post a Comment