Monday, April 11, 2011

त्याचं काय आहे !

गाडी साईडला घ्या, सिग्नल दिसत नाही काय ?
त्याचं काय आहे, डाव्यालाईनी मधुन एकदम उजवीकडे येण्याच्या नादात दिसला नाही

घ्या. लाईन पण मोडलीत.
त्याचं काय आहे, मोबाईलवर बोलतांना लक्षात आले नाही.

मोबाईलवर बोलत होतात ?
त्याचं काय आहे, बायकोचा फोन होता, सिटबेल्ट लावा सांगायला.

काय, सिटबेल्ट नाही लावलात.
त्याचं काय आहे , दारुच्या नशेत माणुस विसरतो केव्हा केव्हा.

दारु पिऊन गाडी चालवता आणि वरती सांगता ?
त्याचं काय आहे , गाडी चोरतांना फार टेंशन येतं ना मग थोडीशी घ्यावी लागली.

गाडी चोरलीत ?
त्याचं काय आहे , दुकान फोडुन पळुन जातांना चोरीचीच गाडी हवी.

आता दुकानावर दरोडा घातलात आणखीन काय करायचं राहिलयं ?

त्याचं काय आहे, लग्नाच्या चार चार बायका. आता त्यांची पोटं भरायची म्हणजे 
चार बायका ? धन्य आहे तुमची. जा आता खुप बोललात.

त्याचं काय आहे ......

2 comments:

Varsha said...

hah hah..aprateem, original ahey ka?!

HAREKRISHNAJI said...

The answer is YES