Thursday, April 07, 2011

तो आणि ती

तो काहीच बोलला नाही. 
तिने काहीच ऐकले नाही.
ती काहीच बोलली नाही. 
त्याने काहीच ऐकले नाही.
त्यांच्यात म्हटलं तर संवाद घडलाच नाही.
म्हटलं तर खुप काही सांगितले गेले.
ह्या क्षणापासुन आपल्या वाटा वेगळ्या झालेल्या आहेत हे दोघांनाही अचानक जाणवले.


छानसी संध्याकाळ.


ती तिच्या वाटॆने निघुन गेली.


आणि तो त्याच्या.
परतपरत मागे वळुन पहाण्यासाठी.

No comments: