Monday, December 06, 2010

चाबुकच हवा

फाडकन.

फाडकन राजाभाऊंनी त्या ट्रकचालकाच्या मुस्कटात मारली. त्याला लाथाबुक्काने तुडवला आणि वर नारायण धारपाच्या चेतन प्रमाणे चाबकाने फोडुन काढले.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, मुंबई ते पुणे.  वेळ रात्रीचे दहा वाजले असावे.

मधल्या रांगेतुन आपल्या गतीने चालणाऱ्या ट्रकला मागे टाकण्यासाठी उजव्या बाजुने राजाभाऊंनी गाडी पुढे काढली. काहीश्या वेगात.  उजवी लेन, ओव्हरटेक करण्यासाठीच त्याचा उपयोग करावा, हा नियम, सुरक्षतेसाठी केलेला नियम, सुरक्षितता आपली व दुसऱ्यांची, आपल्या गाडीत असलेल्या माणसांची, दुसऱ्या गाडीत असणाऱ्यांची आणि जी हवी आपल्या कुटुबीयांसाठी.

अरे, हा गृहस्थ ट्रक या रांगेत असा हळु हळु काय चालवतो आहे, याचे डोके ठिकाणावर आहे की नाही, याला साधे नियम कळत नाहीत ? आणि या ट्रकच्या मागे केवढे प्रखर लाईट लावले आहेत, डोळे दिपले ना.

संताप, सात्विक संताप.

नशिब शेवटच्या क्षणी कळले , हा चालक आपल्या पुढे ट्रक चालवत नसुन आपल्या दिशेने येत आहे. नशिब आयत्यावेळी मधल्या लाईन मधे कोणी नव्हते. नशिब त्या चालकाचे, त्याचा हातुन मनुष्यवधाचा निदान या मनुष्याचा तरी गुन्हा घडायचा नव्हता.

फाडकन.

फाडकन राजाभाऊंनी त्या ट्रकचालकाच्या मुस्कटात मारली. त्याला लाथाबुक्काने तुडवला आणि वर नारायण धारपाच्या चेतन प्रमाणे त्याला चाबकाने फोडुन काढले. 

सारे मनातल्या मनात.

आतापर्यंत द्रुतगती मार्ग काय राष्ट्रीय महामार्ग काय येथे उलट्या बाजुने गाडी चालवत मजेत जाणारे अनेक बेदरकार चालक दिसतात, भेटतात, अगदी गळाभेट होईस्तो, मोटरसायकल, रिक्षा, ट्रकटेम्पो पासुन अवजड क्रेन, डंपर पर्यंत.

पण या वेळी,

या वेळी मात्र हाईट झाली.

पोलीस झोपा काढतात.

1 comment:

हेरंब said...

>> पण सारे मनातल्या मनात.

हेहेहे.. तेच म्हटलं राजाभाउंनी हातपाय चालवले?? ज्याप्रमाणे पुल म्हणतात की सराफाचं नाव आम्ही फक्त ऐकूनच असणार त्याप्रमाणेच आपण सगळेजण हे फक्त मनातल्या मनातच करणार !! :) :(