Sunday, May 09, 2010

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई.

स्नेहसंमेलन, स्नेहमेळावा म्हटले की पहिल्याप्रथम डोळ्यासमोर येतात ते त्याच्यात होणारे वादविवाद, हाण्यामाऱ्या , कुटाकुट्या, उखाळ्यापाखाळ्या.

पण हे ब्लॉगर्सचे विश्वच न्यारे, येथे या सर्वाला अजिबात स्थान नाही. आज मुंबईमधे पहिलापहिला मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदात पार पाडला.  

आपण ज्यांचे ब्लॉग वाचतो, जे आपल्याला आवडतात, आपल्या व इतरांच्या आवडीनिवडी सारख्या असतात, ज्यांना आपण नेटवर नेहमीच भेटत असतो पण ज्यांचा चेहरा आपल्याला अपरिचीत असतो अश्यांशी प्रत्यक्ष भेट व्हावी, विचाराची आदानप्रदान व्हावी, आपल्याला असणारे ज्ञान इतरांना द्यावे , त्यांचाशी ओळख करुन घ्यावी  या उद्देशाने मराठी ब्लॉगर्सच नव्हे तर ब्लॉगस वाचणारे देखिल आज मुंबईमधे दादर सार्वजनीक वाचनालयाच्या दासावि सभागृहात जमले.

हि संकल्पना कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी व रोहन चौधरींची, केवळ मुंबईतलेच नव्हे तर नाशिक , पुण्यापासुन पार हैद्राबादपर्यंतचे ब्लॉगर मंडली येथे एका अनामिक ओढीने जमली होती. 

सर्वांना भेटुन , त्यांच्याशी बोलुन खुप आनंद झाला. 

सर्वात छोटा ब्लॉगर आर्यन पासुन ते अनेक जेष्ठ नागरीकांपर्यंत आज एकाच उद्देशाने आले होते , आणि तो उद्देश सफल झाला. 

सुरवात कांचनताईंनी या मेळाव्याचे उद्दिष्ट काय आहे, त्याची कल्पना कशी सुचली या पासुन झाली, मग सर्वांनी आपली ओळख करुन दिली.

अनेक तांत्रीक बाबतीविषयी अर्थपुर्ण चर्चा येथे झाली.

अनेक विषयांवर जवळजवळ    ३२ ब्लॉग लिहिणाऱ्या लीना मेहंदळेमॅडमनी मराठी मधे संगणाकावर टंकलेखन करतांना देवनागरी लिपीचे जतन करण्यासाठी फोनेटिक हा अक्षर-अनुक्रम न वापरता इन्स्क्रिट अनुक्रम वापरावा हे प्रतिवादन करुन या संबधी मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री.ओक यांनी जसे आंग्लभाषेत Speelcheck आहे त्याच प्रमाणे हि सोय मराठीमधल्या लेखणासाठीही त्यांनी    तयार केल्याचे सांगितले.

या मेळाव्याचे अत्यंत सुरेख आयोजन या त्रिकुटाने केले होते, त्याबद्द्ल त्यांचे धन्यवाद. आणि हो , बटाटावडा व कटलेटस लाजबाब होती.

  

16 comments:

हेरंब said...

राजाभाऊ मस्तच !.. एकूण अपेक्षेपेक्षाही एकदम दणक्यात झाला तर मेळावा.. वा.

मेळाव्याचं वर्णन आणि सगळे (प्रामुख्याने वडा आणि कटलेट्सचे) फोटो आवडले :P

सचिन उथळे-पाटील said...

काका ,एकदम मस्त घेतलात धावता आढावा.

फोटो एकदम मस्त आलेत बरका.

भानस said...

क्या बात है! तुम्ही लोकांनी किती मज्जा केली ते जाणवतयं... प्रत्यक्ष नसलो तरी मनाने होतोच आम्ही तिथे. बाकी ते वडा व कटलेट्स पाहून तोंडाला पाणी सुटलेयं... :)

tanvi said...

खरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता भारतात आले की गाठणार तुम्हाला सगळ्यांना नक्की…. :)

फोटो मस्तच आहेत :)

अमोल केळकर said...

नमस्कार,

मजा आली या मेळव्यात. सर्वांची ओळख झाली.

सर्व संयोजकांचे आभार

अमोल केळकर

Pankaj - भटकंती Unlimited said...

आयला, वडा आणि कटलेट मिस केले मी. आणि ब्लॉग-गप्पांची स्वीट डिश पण.

आर्यन केळकर said...

तुम्हाला प्रत्यक्ष भेटुन आनंद वाटला.
कटलेट आणि ब.वड्याचा फोटो तुम्हीच टाकलाय फक्त, मस्तच.
सोनाली केळकर

प्रमोद देव said...

एकदम सुटसुटीत वर्णन....आणि हेरंब म्हणतो ते बाकी खरं आहे हं...ते खाद्य वस्तुंचे दर्शन तर खासच आहे...शोभता खरे खादाडी राज्याचे पंतप्रधान!

davbindu said...

इतर स्नेहसंमेलनातील फ़रक बरोबर टिपलात..खरच काल एकदम खेळीमेळीचच वातावरण होत तिथे आणि सगळ्यांना भेटुन खुप आनंद झाला...वड्याचे आणि इतरही फ़ोटो छान आले आहेत...

शांतीसुधा (Shantisudha) said...

हो ना, बाकीच्या वृत्तांतात आणि तुमच्या वृत्तांमधे हा एक मोठा फरक: बव(बटाटे वडा) आणि कटलेट्स चे फोटो. :-):-)

सचिन उथळे-पाटील said...

काका, काल मी टाकलेली कमेंट का नाही दिसत आहे.

तुम्हालाहि भेटून खूप खूप आनंद झाला.

असेच भेटत राहू.

-सचिन

Pankaj - भटकंती Unlimited said...

वृत्तांत छान आहे. आम्ही मुकलो या आनंदाला. :-(

भानस said...

राजाभाऊ,लगेच टिपणी टंकली होती..., पण दिसत नाही. :( मिळाली नं? बाकी सकाळी सकाळी पुन्हा एकवार वड्याच्या दर्शनाने पोट गुरगुरायला लागलेयं... :)

Vivek said...

छानच वर्णन झालंय. तिथं येणं जमलं नाही पण वाचून त्याची उणीव भरून निघाली.

फोटो छान आलेत, फक्त नावं दिली तर बरं होईल. पहिला कांचनचा आणि तिसरा आर्यनचा असणार.

-विवेक.

Mahesh Savale said...

वा फारच छान....

आनंद पत्रे said...

तुम्हाला भेटून खुप छान वाटलं...