Wednesday, November 25, 2009

पुढे काय ?

अहवाल शेवटी सर्वांसमोर १७ वर्षानी की होईना पण आला.

गरीबबापुडॆ बिचारे या खेळात मरणारे मेले. सत्ता भोगणारे सत्ता भोगत राहीले.

काय हो राजाभाऊ , या लोकांना कधी सदविवेकबुद्धीची  टोचणी लागत असेल काय ?

2 comments:

Anonymous said...

'सत्ता भोगणारे सत्ता भोगत राहीले. '
----

सगळे बस-चालक बेज़बाबदार असतात ही समज़ूत चूक असते, यावर तुम्ही प्रकाश पाडलात. पण सत्ताधीश नेहमीच ती भोगतच राहतात या समज़ाला मात्र बळी पडलात. बरेच सत्ताधीश त्यांच्यापरीनी देशासाठी काम करतात.

मोठ्या आंदोलनामुळे काही काळ सुरळीत जीवन अशक्य होतं. शिवाजी उठाव करतो, त्याची झळ पुण्याला तर लागतेच पण विज़ापूरच्या हिंदु लोकांनाही लागते. १८५७ आणि १९४२ मधे चळवळ सुरू होते; त्याचा त्रास लोकांना भोगावा लागतो. अनेक लोकांचे प्राणही ज़ातात. त्याला इलाज़ नाही. सध्याच्या पिढीच्या आयुष्यात इतकं चांगलं जीवन आलंय की लोक लाडावून गेले आहेत. एक दिवस फोन बंद पडला की महासंकट आल्यासारखे वागतात.

अडवाणींमधे (किंवा बाबरी मशीद समितीच्या लोकांतही) विवेकबुद्‌धी नव्हती असं नाही, तर त्यांच्यापुढे ध्येय होतं. त्यासाठी ते लढताना नेहमीची सुरळीत घडी विस्कटू शकते.

ग प्र प्रधान एकदा म्हणाले की काही लोकांना नियती इतकी प्रभावानी खुणावत असते, की त्यापायी इतरांना होणारा त्रास माहीत असूनही ते आपला मार्ग सोडत नाहीत. प्रधान हे समाज़वादी, म्हणजे माझ्या शत्रूपक्षातले. पण माणूस फारच थोर आहे. विद्‌वान तर आहेच, प्रभावी वक्ता आहे. आणि हे त्यांचं विश्लेषण त्यांच्या विद्‌वत्तेवर प्रकाश टाकतं. त्यांची ३-४ भाषणंच मला ऐकायला मिळाली. पण प्रत्येक प्रसंग मनात घर करून राहिला आहे.

- डी एन

HAREKRISHNAJI said...

Well , I feel the difference is those were struggle for freedom and this was struggle for power.

When I said "सत्ता भोगणारे सत्ता भोगत राहीले" , in am not including everyone under the same umbrella.