Sunday, November 15, 2009

गांधीजी, टिळक व आत्ताचे नेते

माननीय सरसंघचालकांनी गाधींजीचे व टिळकांचे काही निर्णय चुकल्याचे प्रतिपादन केल्याचे आजच्या दै. सकाळ मधे वाचनात आले.

गांधीजी, टिळक हे झाले इतिहासातले नेते. इतिहास आता मागे पडला.  


यांच्या चुकां ऐवजी आत्ताच्या नेत्याचे किती आणि काय कसे चुकले किंवा ते कसे चुकत आहेत याबद्दल ऐकायला आवडेल.  

राममंदिरासाठी देशभर निर्माण केले गेलेले वातावरण, गुजरात मधले दंगेफसाद , अनेक होत असलेले आर्थिक 
घोटाळे अश्या अनेक बाबी.

2 comments:

Anonymous said...

चला क्षणभर म्हणू या की श्री.भागवत साहेब जुने संदर्भ देतात म्हणून हे प्रतिगामी वाटते.

" हा जय नांवाचा..." मधे प्रस्तावनेत श्री आनंद साधले म्हणतात की तत्वज्ञान हा गुहेतल्या चिंतनाचा भाग असतो तर त्यापासून व्यवहार वेगळा असतो."
भागवत साहेबांच्या व्याख्यानाला आता साधलेंच्या पुरोगामी विचाराबरोबर जोडून पहावं का?

मला वाटतं की साधलेंची तथाकथित पुरोगामी भाषादेखील व्यवहाराला तात्विक किंवा वैचारिक बैठकीपासून वेगळी करते. आपण आपल्या आवडत्या साहित्यिकांमधे श्री साधले यांचा उल्लेख केला आहे म्हणून विचारतोय.

मुख्य म्हणजे आपला व्यासंग आफाट आहे. पण मला सर्वाधिक आवडतो तो त्यातला प्रांजळ निर्भीडपणा. :)
- रमण ओझा.

HAREKRISHNAJI said...

Dear Shri Ramanji Oza,

Thanx for your kind words.