Saturday, November 14, 2009

कॅफे मोमो , कोर्टयार्ड मेरीयेट, हिंजवडी, पुणे




आधीच मर्कट त्यात मद्य प्याला.

राजाभाऊंची काहीशी अशी विचित्र अवस्था या कॅफे मोमो बाबत झाली आहे. पुण्यामधल्या एका अतिशय उत्तम , दर्जेदार, आणि चविष्ट बुफे मिळणाऱ्या या ठिकाणाबद्द्ल  श्री. शंतनु घोषच्या ब्लॉगवर दोन महिन्यापुर्वी त्यांनी वाचले व जेवायला गेले. हे ठिकाण एवढे आवडले की तेव्हा पासुन ते जवळजवळ दर शनिवारी येथे बफे जेवायला जात आहेत.  त्यात परत कधी नाहे ते त्यांची बायको येथल्या बफे जेवणाच्या कधी नाही ती प्रेमात पडली.


मधेच केव्हातरी त्यांना " एकावर एक जेवण फुकट" ची कुपने हॉटॆल तर्फे भेट देण्यात आली.  मग काय , त्या कुपनांचा लाभ उठवायला नको ? खर तर त्यांना "सयाजी" मधे बुफे जेवायला जाण्याची तिव्र इच्छा होती पण या कॅफे मोमोने सध्यातरी त्यांचे पोट बांधुन ठेवले आहे (आणि वाढवुनही. )

छानसे ऍंबियन्स, हसतमुख सदैव तत्पर कर्मचारीवर्ग. जेवणात सॅलेडसचे अनेकविध प्रकार, चार पाच स्टाटर्स , पाच सहा भाज्या, पुलाव किंवा बिर्याणी , दोन प्रकारची डाळ आणि भरपुर डेजट्स . किती हाणु नी किती नाही असे होते. चांगले दिड दोन तास लागतात चवीचवीने , एकेक पदार्थाचा आस्वाद घेत जेवायला.

आज त्यांना सब्जी बिर्यानी व डाल माखनी खुप आवडली, अगदी डेलीकसीच. खास त्याच्या साथी त्यांनी पोटाचा एक कोपरा रिकामा ठेवला होता. एक बरेहोते की दर वेळी त्यांना येथे नवे नवे पदार्थ खायला मिळतात.
मेनु नेहमी बदलता असतो.

आता पुढच्या शनिवारी मात्र येथे नको , जरा बदल हवा के नको ?

2 comments:

Anonymous said...

आधीच मर्कट *तशातहि* मद्य प्याला ...
वसंततिलकेच्या ओळीत १४ अक्षरे हवीत; तिथे *तशात* हा शब्द बसत नाही. आणि तो 'हि' र्‍हस्व हवा, एरवी गण बरोबर पडायचे नाहीत.

HAREKRISHNAJI said...

चुकीबद्द्ल क्षमस्व.