एकंदरीत आपल्याकडॆ सौदर्यदृष्टीचा अभाव आढळतो. प्राचीन, पुरातन वास्तु, वारसा, कला, संस्कॄती यांचे जतन , त्याच्या विषयीची माहिती, लेण्यांची महती, त्यांचे सौंदर्य, वास्तुकला या विषयी अनादर व अनावस्ता जास्त दिसुन येते.
लोणावळ्याजवळ असलेली काल्याची लेणी. जवळ्जवळ दोन हजार वर्षे हि लेणी बांधल्याला झाली असतील. यातले चैत्यगृह हे एकमेवाद्वितीय आहे.
वास्तवीक पहाता त्याच्या बाहेर असलेले एकविरादेवीच्या मंदिराचे स्वरुप या साऱ्या प्राचीन लेण्यांना मिळतेजुळते, साजेसे, त्याच्याशी समरस होणारे असे करायला हवे होते. पण. सुशोभिकरण म्हणजे देवालयाच्या दगडी भितींना कोणताही सारासार विचार न करता भडक रंग मारणे येवढेच आपल्याला समजते. अनेक ठिकाणी अश्याप्रकारचे रंग मारुन भिंतींच्या बाह्यरुपाची वाट लावलेली आढळुन येते.
त्यात देवळाबाहेर उभारल्या गेलेल्या लोखंडी पिंजऱ्यांमुळे विद्रुपतेत आणखी भर टाकली गेली आहे.
या साऱ्या परिसराकडॆ एकंदरीत साऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
नेहमी प्रमाणॆच येथे येणाऱ्या भाविकांनी या संपुर्ण परिसराचे रुपांतर डंपींग ग्राउंड मधे करुन टाकलेले आहे.
No comments:
Post a Comment