Monday, November 16, 2009

सहप्रवासी

प्रवासामधे काही सहप्रवाश्यांना सवय असते. ते तुमचे नाव , गाव, तुम्ही काय कसता , कुठे नोकरी करता, या सारख्या चौकश्या करत रहातात. 

एक किस्सा वाचल्याचे आठवले.

एका तरुणाने ट्रेन मधे एका म्हाताऱ्या माणसाला किती वाजले हे विचारले.

त्य म्हाताऱ्या माणसाने काहीही जबाब दिला नाही. परत त्या तरुणाने हाच प्रश्न विचारला.

"सांगणार नाही "

" पण का ? "

मग त्या म्हाताऱ्या माणसाने कारण सांगितले.

" आत्ता तु मला वेळ विचारलीस व माझ्याशी बोलण्याचे  सुरु केलेस. मग हळुहळु प्रवासात आपले संभाषण वाढायला लागेल. मग विचारशील, तुम्ही कुठे निघालात ?  कुठुन आलात ? काय करतात ?

मग मधेच माझ्या घरापर्यंत पोचशील. कुठे रहाता ? घरी कोण कोण आहे ? मग माझी मुलगी तरुण आहे हे कळल्यावर मग मला आपल्या बद्द्ल सांगायला लागशील, हळुच तिला लग्नाची मागणी घालशील.

पण ज्याची एक साधे घड्याळ घेण्याची ऐपत नाही त्याला मी कद्यापी माझी मुलगी देणार नाही "

1 comment:

भानस said...

haa..haa... मुखपृष्ठ फारच आवडले.:)