संगीताच्या तालावर मन थिरकत असतांना एका व्याकुळ क्षणी राजाभाऊंनी आपल्या दुरावलेल्या (शिक्षणासाठीच की त्यांच्या चमत्कारीक स्वभावामुळे ?) मुलाला मोबाईल वरुन कॉल करुन दोन क्षण Steel Pan चे मंत्रमुग्ध करणारे ताल ऐकवले व लागलीच SMS केला.
Miss U ( तु येथे या क्षणी माझ्या बरोबर हवा होतास रे, हे enjoy करायला )
उत्तर आले.
"Me Too."
आता चटणी ही तर खायची गोष्ट झाली. आज नविन धडा मिळाला. हा एक गाणॆबजावणॆ , नाचाचा प्रकार.
आता पर्यंत बायकोने रागाने आदळ आदळ आपटलेल्या भांड्याचा ठण, ठण्ण, ठण्ण्ण, ठणठणाना आवाज माहित होता पण हेच स्टीलचे भांडे एवढा सुमधुर नाद निनाद कसा काय उमटवु शकते ?
आपण मुंबईमधे आहोत का बिहारमधे की वेस्ट इंडिज मधे ? ही भोजपुरी गाणी यांना कशी काय येतात ? मुंबईमधे येवढे बिहारी भरलेले आहेत तरी आपण मराठी लोकाना ही भाषा बोललेली धडपणॆ समजत देखील नाही.
काय या माणसाचे अंग लवचीक आहे. या जमिनीलगत आडव्या ठेवलेल्या काठी खालुन हा नाचता नाचता कसा काय वाकुन दुसरी कडुन बाहेर येवु शकतो ? (राजाभाऊंनी हा नृत्य प्रकार करण्याचा प्रयत्न कधीकाळी केलाच तर त्यांचे भले मोठाले पोट आड येवुन ही काठी पडायची. )
आज Indian Council for Cultural Relations नी आयोजीलेला Trinidad & Tobago मधुन आलेल्या कलाकारांनी त्यांच्या देशातील संगीत व नृत्य सादर केलेला बहारदार कार्यक्रम बघायला मिळाला.
No comments:
Post a Comment