Sunday, November 08, 2009

कविता महाजनांचं "ब्र

एखादे पुस्तक परत वाचायले घेतले की त्यातली सौदर्यस्थळॆ नव्याने जाणवु लागतात. त्याचे एक वेगळॆच रुप ध्यानी येवु लागते.

पहिल्यांदा कविता महाजनांचं "ब्र ’ वाचले तेव्हा मनात स्वयंसेवी संस्था, त्यांची कार्ये, सामाजीक प्रश्न , समाजसेवा या विचारांचा पगडा जास्त असल्यामुळे त्या अनुषंघाने "ब्र" वाचले गेले होते.
तेवढेच डोक्यात शिरले होते.


पण आता या वेळी या कादंबरीतील आलंकारीक भाषा नव्याने उलगडुन राहिली आहे.


"संध्याकाळ थोडी निवांत मिळाली.
गेस्टहाऊसमागच्या  मोकळ्या डोंगरावर गेले चढून.
अनेक चढ उतार. मधूनमधुन सपाट पातळी .. . वेगळ्या रंगछटा घेऊन येणारी.
मी एकटीच.
कुणीही नाही आसपास.
नुसता वारा. अंगातून आरपार जाणारा.
सगळीकडॆ दरवळणारा गारवा.
वाऱ्याचे गार तळवे इतक्या विलक्षण स्पर्शाची अनूभूती देणाअरे होते की, अंगावरच्या कपड्यांचंही ओझं वाटायला लागलं
आणि आकस्मिकच सकाळी खाली दिसलेल्या ग्लेरीशिडीच्या गुलछड्यांचं रानच एका सपाटीवर दिसलं समोर उभं.
पाझरणारा कोवळा प्रकाश आणि पाखरांचा किलबिलाट. फुलांच्या गळून पडलेल्या सुकलेल्या पाकळ्यांचा खच पायतळी दिसला. लालस जांभळ्या रंगातला निळा अंश तेवढा त्यांवर राहिलेला आणि पांढरी छटा पिवळेपणाकडे झुकलेली.
वाटळ, एक मूळ रंग असा शेवटी कधीतरी उघडा पडतोच.
एक काळा पक्षी घायाळ करणारी शीळ घालत राईतून सण्णकन उडला आकाशात.
मातकट रंगामधून मधेच डोकवणारा एखादा ठाम विचारासारखा कातळ.
मी स्तब्ध उभी पाचोळ्यावर. "  

किंवा

"मग अलगद एकेक झुडूप, एकेक झाड पोपटीकोवळ्या हिरवेपणानं डोकावु लागेल आपल अस्तिव दाखवत. पाखरांचे आवाज ओघाळत येतील फांद्यांफाद्यांवरून. पंखांवरचे थेंब झटकन उडत जाईल एखादं पाखरू अंगावरून. झडझडून भिजवून जाईल एखादी सर. तिच्या नादात पुन्हा सारं हरवल्यागत वाटेल धुक्यातल्यासारखंच. तो मोकळा पाऊस झेलत , अलगद पुन्हा उतरून परतू घरी. " 


अरे. हे सर्व आले कुठुन. हे तर तेथेच होते की , पण आपल्याला आधी जाणवलेच कसे नाही ?
भराभर वाचत पुस्तक हाताबाहेर करण्याची राजाभाऊंची सवय मोडीत काढुन त्यांची नजर " ब्र " ही अशी रेंगाळत का बरं ठेवत आहे ?



No comments: