Thursday, November 05, 2009

राजाभाऊ आणि उकडीचे मोदक


राजाभाऊंच्या  उत्तराने त्या बाईंनी एकदम चमकुन त्यांच्याकडॆ पाहिले  व काहीही न म्हणता त्यांनी पुढे केलेल्या ताटलीत त्यांनी सातवा मोदक वाढला.

"अजुन किती देवु ?  " हा त्यांचा प्रश्न.

स्थळ कोकण महोत्सव, मागोठणॆ आगार.  त्या स्टॉलवर उकडीच्या मोदकाचा खासा बेत.

" जो पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत "  राजाभाऊंनीं त्यांना सांगितले.

आणि राजाभाऊंनी त्या दिवशी आपला शब्द खरा केला आणि मग ओशाळलेल्या राजाभाऊंनी मी नुकताच तापातुन उठलोय, गेले दोन दिवस उपाशी आहे , हा खुलासा केला.

 ( तरी पण काय झाले ? हा बकासुरी बाणा ? )

आज सकाळ पासुन त्यांच्या बायकोचे चार फोन , तु येथे असायला हवा होतास, आज संकष्टी. मी उकडीचे मोदक केले आहेत.

मग ते वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी तांबेंकडॆ गेले, " मोदक संपले"  हे ऐकुन घ्यायला.

नशिबाने "कोल्हापुरी चिवडा " मधे त्यांना ते मिळाले.

दोन मोदक खाल्यानंतर त्यांना मालकांनी विचारले , "कसे झाले आहेत ?"

"आणखीन एखादा खावासा वाटतो " - इती राजाभाऊ.

एक मागितला तर वेटरनी प्रेमाचा आग्रह करत दोन मोदक आणुन दिले.

कठीण आहे.

बाप्पा तुची भक्‍तांना बिघडवीसी !   

No comments: