आज राजाभाऊंची पुतणी तणतणत घरी आली. खेळण्याच्या नादात तिची पाणीपुरी खाण्याची राहुन गेली होती. योगायोगाने अगदी जरासेच आधी त्यांना एक प्रसंग आठवत होता.
रात्रीचे अकरा वाजले असावेत. थकलेल्या भागलेल्या, भुकेल्या अवस्थेत ते मुंबईला पोचले. उपहारगृहात जेवण येण्यास खुप वेळ लागत होता. कळ काही काढवत नव्हती. भुक सहन होत नव्हती.
आणि याच वेळी बाजुच्या टॆबलावर बसलेला माणुस समोर आलेल्या जेवणाच्या ताटाकडॆ दुर्लक्ष करत मोबाईल वर बोलण्यात मशगुल होता. १० -मिनीटॆ , १५ मिनीटे.
राजाभाऊंच्या बाजुला एक वृद्ध मुस्लीम गृहस्थ बसले होते. न राहवुन राजाभाऊ त्यांना म्हणाले.
"क्या आदमी है. सामने खाना है ये इनकी मोबाईल पर बात खतमही नही हो रही है"
त्यांनी एक फार मोलाचे वाक्य सांगितले.
"नेहमी माणसाने अन्नाचा इंतजार करायला पाहिजे. कधीही अन्नाला तुमची वाट बघायला लावु नये. "
1 comment:
शंभर टक्के सहमत.:)
Post a Comment