दयाराम दामोदर. दादर टी टी, मुबंई
हजारदिड हजार वर्षे झाली. दयाराम दामोदरकडची सुतारफेणी खावुन. ही सुतारफेणी म्हणजे काळेकाकुंची परमप्रिय. आणि जवळजवळ तेवढीच वर्षे झाली असतील दयाराम दामोदरकडचे खोबरा पॅटीस खावुन. हे राजाभाऊंना काल अगदी प्रकर्षाने जाणवले आणि मग काय नास्ता माटे डी.दामोदर मां.
पण कोणत्याही गोष्टीचे निर्भेळ सुख मिळु नये असे का नियती सांगत असते ?
गेल्या खेपेस खोबरा पॅटीस मिळाले नव्हते. काल खोबरा पॅटीस मिळाले तर त्यासोबत चटणी नाही. लॉजीक काय तर उपवासाच्या दिवशी आम्ही चटणी बनवत नाही.
हाय, किसीके पेट मे भुक पैदा कर देना और उसे चटनी बिना अधुरी छोड देना, भगवान तुने ये अच्छा नही किया. आता चटणी शिवाय खोबरा पॅटीस ? काय हा घोर प्रसंग. त्यात आधीच इन्दौरनी ह्या खोबरा पॅटीस बद्दल वाईट आदत लावुन ठेवलेली. बाबांनो असं करु नका, चटणीशिवाय खोबरा पॅटीस मग तो कितीही चांगला असो माणुस कसं काय खावु शकतो ?
खोबरा पॅटीस खावुन दिल नाय भरला, मग सुरळीच्या वड्या, खांडवी. ह्या सुरळीच्या वड्या एकदम टॉप. बढीया. रस्तावर उभे राहुन हा कार्यक्रम झाला, मग सुतारफेणीचा मुख्य कार्यक्रम.
सुतारफेणी थंडगार दुधाबरोबर खुप छान लागते असे ऐकलेले, पण अजुनपर्यंत हा दुग्धशर्कारा योग काही जुळुन आलेला नाही. अर्थात त्यासाठी सुतारफेणी घरापर्यंत पोचायला लागते हा भाग वेगळा. आणि सोबत म्हैसुर पाकचा एकच तुकडा उगीचच नावाला.
No comments:
Post a Comment