Wednesday, December 15, 2021

जगात भारी कोल्हापूरी, गणेश गल्ली जवळ, लालबाग. मुंबई.

 राजाभाऊंनी इस्लामपुरला बऱ्याच वर्षापुर्वी "अख्खा मसूर" खाल्ला होता. त्याची चव ते अजुन पर्यंत विसरले नाहीत. ह्या "अख्खा मसूर"नी त्यांना व काळेकाकुंना दिवाणे करुन सोडले होते.

मग असचं एकदा त्यांना पुण्यामधे सिटी प्राईट टॉकीज समोर, सातारा रोडवर "जगात भारी कोल्हापूरी, अख्खा मसूर" चा बोर्ड दिसला होता.  मग काय आत जाणे आणि परत एकदा खायला जाणे क्रमप्राप्त होते. न जाऊन कसे चालेल ? अख्खा मसूर, भली मोठी रोटी अणि नंतर खुस्का राईस. हे रेस्टॉरंट पण राजाभाऊंना खुप आवडले होते. अगदी इस्लामपुरची आठवण झाली.

आज सकाळी खाद्यभ्रमंतीच्या बाबतीत राजाभाऊंनी गुरु मानलेल्या श्री. आशिष चांदोरकर यांनी अपलोड केलेल्या पुण्यातील "जगात भारी कोल्हापूरी , अख्खा मसुर" ह्या एका हॉटेलचा व्हिडीयो पाहिला, त्यात मुंबईमधे त्यांनी नुकतीच आपली शाखा उघडल्याचे कळले मग काय सायंकाळी राजाभाऊ काळेकाकुंसोबत तेथे पोचले.  

उत्तम अंतर्गत सजावट असलेले हे रेस्टॉरंट पहाताक्षणी राजाभाऊंना भावले. संध्याकाळी फक्त पार्सल सेवा उपलब्ध असल्यामुळे पार्सल घेवुन ते घरी आले.

काळेकाकुंना जेवण आवडले हे वेगळे सांगायला नकोच.

जगात भारी कोल्हापूरी,

नारायण आश्रम, गणेश गल्ली जवळ, लालबाग. मुंबई.




No comments: