Wednesday, January 21, 2009

आदिपश्य - दैवगती न कळे कोणा

सुन्नपणा. निव्वळ शुन्यता, स्थब्धता आणि अस्वस्थता.
जेव्हा एकाद्याला कळते की आपल्या हातुन ज्याचा वध झाला तो त्याचा सख्खा जन्मदाता पिता होता आणि जिच्याशी त्याचे लग्न केले , जिच्यापासुन त्याला संतती झाली ती त्याची जन्मदाती आई.
सुन्नपणा. निव्वळ शुन्यता, स्थब्धता आणि अस्वस्थता. ही माझ्या मनाची अवस्था, "आदिपश्य" पाहील्या नंतरची. ही होमरचे "इलीयड" माहीती असुन देखील , जेव्हा विनय आपटॆ, निखील हजारे यांनी सादर केलेले, महाराष्ट्राची किर्तन परंपरा आणि ग्रिसमध्ये पुरातन काळापासुन चालत आलेली ग्रीक शोकांतीकाची नाट्यशैलीतील कथा पाहिल्यानंतरची.
हे असे होणार आहे ही दैवीवाणी, विधीलीखित ऐकल्यानंतर ते घडु नये यासाठी दुरवर निघुन जाणाऱ्या आदिपश्याच्या नशिबी शेवटी त्याच यातना असतात. ज्यांना तो आपले मातापिता समजत असतो त्यांनी तर त्याला दत्तक घेतले असते आणि .....
एक जबरदस्त नाट्यप्रयोग, अनोख्या शैलीत सादर केलेला. सर्व कलाकारांची कामे अप्रतीम.
एक जी.ए. ची गोष्ट आठवली.
वादळी रात्रीत, तीन चार दिवस सतंतधार लागलेल्या मुसळधार पावसात, निबीड अरण्यातील एक लहानसे , तान्हे , पंखात बळ न आलेले पोपटाचे पिल्लु, दोन दिवसात त्याचे मरण हि विधीलीखित.
एक गरुड त्याला मदत करतो, आपल्या पाठीवर घेवुन त्याला दुरवर पर्वतावर , उच्च शिखरावरील एका गुहेत , सुरक्षीत जागी घेवुन जातो, मॄत्यु पासुन दुर, फार दुर.
परततांना त्या गरुडाला चिंताक्रांत यमदुत भेटतो. त्या पिल्लाचा मृत्यु दोन दिवसांनी याच पर्वतावर , उच्च शिखरावरील एका गुहेत होणार असतो, पण ज्याच्या पंखात उडण्याचेही बळ नाही ते पोपटाचे पिल्लु येवढ्या लांब कसे काय येवु शकणार व त्याचा प्राण आपण त्याच वेळेत कसा काय हरण करु शकणार या चिंतेने ग्रासलेला.

3 comments:

मन कस्तुरी रे.. said...

कुठे पाहीलंत हे नाटक? खरंच मन विषण्ण होतं....
जी एंची पोपटाच्या पिल्लची गोष्ट तर फारच परीणामकारक.
अशी विलक्षण कल्पना फक्त तेच करु जाणे

Shirish Jambhorkar said...

Gosht chan aahe

HAREKRISHNAJI said...

Ashwini,

After long long time. Where were you all those days ?

I saw "Adipashya" at YB Chavan Centre Mumbai. Do not miss it pl when the troupe is in Pune

Shirish,

It's a greek ipic.