क्षणार्धात, क्षणमात्रात अवनीतुन धरतीचा, वसुंधरेचा वेध घेणाऱ्या , तिला कवेत घेण्यासाठीची विद्युलतेची, सौदामीनीची चपळता खरी की तबल्यावर थिरकणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेनच्या उंगलीयॉची ? सळकन निसटुन जाणाऱ्या मासोळीची मोहक हालचाल खरी की ? मस्तवाल टकरा घेणाऱ्या मेघांचा कडकडात खरा की उस्तादांनी काढलेले तबल्याबरचे बोल ?
हाय मै तो मर जांवा.
केली महोत्सवाला काल पासुन सुरवात झाली आहे.
एक मात्र माझे दुर्दैव. नशीबाने मी जेथे बसलो होतो त्याच्या बाजुलाच त्यांचा "कंपु’ की चमचे मंडळी बसलेले. आता तबल्यावरची थाप ऐकावी की यांचे "वाह वाह वाह वाह आणि वा वा ", उस्तादांना बघायचे , ऐकायचे की यांचे हातवारे व डोल डोल डोलणॆ ? कंटाळा आणवला. त्यांना अतीउत्साहाला आवर घालायला स्पष्टपणे सांगायला हवे होते.
काल मला वाटायला लागले की आता झाकीर भाई लोकानुनय जास्तच करायला लागले आहेत की काय ? केवळ लोकांना खुष करण्यासाठीचा हा खेळ आहे काय ?
मग त्यापेक्षा आपण पं. सुरेश तळवळकर आणि पं. विभव नागेशकर यांचे तबलावादन ऐकल्यानंतर आपल्याला किती समाधान मिळाले होते
No comments:
Post a Comment