Saturday, January 03, 2009

माहे कामिल - पुर्णचंद्र

याद आ जाता है ऐ "सीमाब" अहदे कब्ले इश्क
दिल भर आता है सुकूने माहे कामिल देख कर ||

चांदनी रात, मुहब्बत, प्रेयसी, चंद्रनना, , विरह, शितल चंद्रकिरणांचा दाह, चंद्रमा, पुर्णचंद्र , प्रियेचा मुखचंद्र, यांचा गहरी रिस्ता कवींना नेहमिच मोहवीत आला आहे, भुरळ घालत राहीला आहे. 

कधीतरी अचानक "सीमाब" ला आपले पुर्वीचे सोनेरी दिवस आठवले, जेव्हा तो प्रेमात पडला होता, त्याला इश्कची बाधा झाली होती,  "वो जमाना याद आया" ! 

आणि 

जेव्हा त्यानी गगनात बहरलेला पुर्णचंद्र पाहिला त्या वेळी त्याच्या दिलाला थंडक मिळाली, सुकुन मिळाला, त्याचे मन भरुन आले, त्याला मनःशांती मिळाली.

कदाचीत त्या चंद्राच्या जागी त्याला आपल्या प्रियतमेचा चेहरा दिसला असावा. 

अहदे - जमाना, युग, काळ
कब्ले - अगोदर, आधी
सुकुन- मनःशांती 
माहे कामिल - पुर्णचंद्र 

1 comment:

Vivek S Patwardhan said...

Krupaya arth marathit lihava. Tumhi kahitari changle lihile aahe ase watate.
Vivek