Mumbai Blue (Bombay Blue ) , मुंबई ब्लु की मुंबई निळी कि निळी मुंबई ?
छे, दुकानाच्या नावाची पाटी मराठी मधे असावी की देवनागरी लिपीत ? फारच गोंधळ उडलाय बुवा.
पण हाच गोंधळ ब्युफे जेवताना काय खावे अन काय नको या बाबतीत उडला असता तर बरं झाले असते. गोंधळ उडण्याचा प्रश्नच नव्हता कारण फारसे जास्त पदार्थ नव्हतेच.
चांगले रु. ३७५ मोजलेले.
काय तर दोन भाज्या एक हिरव्या रंगाची हैद्राबादी व्हे. व दुसरी फ्लॉवरचे भले मोठाले तुकडे असलेली सुकी भाजी, डाल, पुलाव. सॅलडस मधे चक्क फक्त कांदयाच्या चकती, पास्ता, पाणी पुरी आणि दही पुरी (?? )
गुलाबजामुन आणि आइस्क्रीम तर व्यर्जीत. मग आता डेसट्र्स मधे काही खायलाच नाही.
त्या पेक्षा मरीन प्लाझा मधला बुफे कितीतरी पटीने चांगला असतो. काही उपहारगृह कशी काय चालतात याचे नवल वाटते.
No comments:
Post a Comment