तु आंबटशौकिन आहेस. माझे एक नातेवाईक मला नेहमी बोलत असतात. ( त्यांना शौक आणि आंबटशौक यातला फरक ते अमराठी असल्यामुळे बहुदा ठावुक नसावा, Hopefuly. असा राग येतो).
सिग्नल. गाडी थांबलेली. फियाट. डुक्कर फियाट. १९५७ चे मॉडेल, ओरीजीनल इटालीयन. मागच्या सीट वर ३ तगडॆ डॉबरमन. सोबत नुरजहांची. "किसी तरह से मुहब्बत मे चैन पा न सके ’. बाजुच्या गाडीतले दोघे वयस्कर मुसलमान गृहस्थ कौतुकाने पहात बोलतात ’ आप तो बडॆ शौकीन आदमी है !’
सात्विक थाळी. सदाशिव पेठ. शेजारच्या बाईंनी राजाभाऊंच्या बायकोचे कान फुकलेले. तिला भुलवलेले.
"मला संक्रांतीचे वाण , हळदीकुंकु वाटायला आणायचयं. तुळशीबागेत आज आपल्याला सकाळी जायचयं. त्या आधी आज आपण बाहेरच जेवु. " आतुन फर्मान.
"आईईईई, मला कॉलेज ला जायचयं, मुकाट्याने घरी जेवण कर’
"ये तु गप रे, आमच्या बरोबर चल, जेव व पुढे जा"
अपिल नाही. जायचे म्हणजे जायचे.
पहिल्याच घासात राजाभाऊ बेहद्द खुश. गोळ्याची भाजी. चिंचगुळ घालुन केलेली. ( गोळ्याची आमटी ठावुक होती पण भाजी ?),
चवदार, रुचकर, साधे, सात्वीक, भोजन. थाळी. झक्कास, सोबत पंचामॄत, वा वा ,भाई, पंचामृत म्हणजे काय, आवडले म्हणुन काय अख्खी वाटी खायचे ? दुसऱ्यांचा विचार करायचा की नाही ?
त्यात परत मसाले भात ! वाढा , अजुन वाढा, राजाभाऊंचे चित्त अडकले होते मसालेभातातल्या काजुत. काजु ताटात पडले, जीव भांडयात पडला.
मऊसुत पोळ्या, सफेद वटाण्याची भाजी ( ही नाही रुचली तितकीशी ) , बटाट्याची सुकी भाजी (ही तर प्रिय ), आमटी, काकडीची पचडी, रसमलाई, लोणाचे पापड व वरती ताक सुद्धा. दर फक्त रु. ५० , अमर्यादीत, हाणा किती हाणायचे ते. अशी सुस्ती आली म्हणुन सांगु. पण तु्ळशी बाग, आता काय करायचे, तंगडातोड करत आकंठ जेवलेले जिरवायचे ?
किती वेळा या टिळक रोड वर गेलो असु, बादशाही मधे चकरा झाला असतील , पण त्याच्या अगदी जवळ असलेले ’सात्वीक थाळी" हे नजरेआड कसे काय झाले होते देव जाणे. आयुष्य अर्धे फुकट गेले म्हणायचे की काय ?
4 comments:
खूप वर्षा पूर्वी मी तिथे गेले होते .तेव्हा फार काही वाटल नाही .... तुमचा हा अभिप्राय वाचून, आता पुण्याला आले की नक्की जाइन. हे माझ्या घराच्या खूप जवळ आहे....!
Sure. Try it out. I liked it today
What happeed to Rajabhau's weight control resolutions? If he says in Pune longer he will gain the lost 10 Kgs!!
As for me I will visit Satvik without any pangs of cnscience!
Thanks for introducing us to a new eating place
Vivek
As the name suggest, they serve Satvik Thali, nothing to worry on the weight control front.
Post a Comment